Ileana D'cruz Mystery Man Photo: इलियाना डिक्रुज सध्या आपल्या प्रेग्नंन्सीमुळे चर्चेत आहे. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा रंगलेली दिसते आहे. अशातच आता तिच्या आणखी एका नव्या पोस्टनं चर्चांना उधाण आलं आहे. 18 एप्रिल रोजी इलियाना डिक्रुज हिनं आपल्या प्रेग्नंन्सीची घोषणा केली होती. त्यानंतर समाजमाध्यमांमध्ये एकच चर्चा रंगलेली पाहायला मिळाली होती. आॉलसपल्या प्रेग्नंन्सीची घोषणा केल्यानंतर तिच्या चाहत्यांना धक्का बसला होता. लग्नाची इलियानानं काहीच अपडेट दिलेली नसताना तिनं केलेल्या प्रेग्नन्सींच्या घोषणनेतर चाहत्यांना पुरता आश्चर्याचा धक्का बसला होता. आता आपल्या प्रेग्नंन्सीच्या घोषणेनंतर ती आता आपल्या मिस्ट्री मॅनबद्दल काही फोटोज पोस्ट करायला सुरूवात केली आहे. त्यात काही दिवसांपुर्वी तिनं आपल्या मिस्ट्री मॅनसोबतच एक फोटो शेअर केला होता


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्यात तिनं खूप मोठी पोस्ट लिहिली आहे. मध्यंतरी तिनं तिच्या साखरपुड्याचेही काही फोटो शेअर केले होते. ज्यात तिनं आपल्यासह आपल्या बॉयफ्रेंडच्या रिंगचे फोटो टाकले होते. त्यामुळे चाहत्यांना पुन्हा एकदा धक्का बसला की प्रेग्नंन्सीच्या बातमीनंतर इलियानानं लगीनघाई सुरू केली आहे का? त्यातूनच आता तिच्या या नव्या फोटोमुळे चर्चांना उधाण आलं आहे. यावेळी तिनं इन्टाग्राम स्टोरीवर हा फोटो शेअर केला आहे. यात तिच्या बॉयफ्रेंडचा फोटो तिनं शेअर केला आहे ज्यात तिचा बॉयफ्रेंड हा एका कुत्र्यासोबत खेळताना दिसतो आहे. 


त्यामुळे नक्की तो कोण आहे यावर सोशल मीडियावर पुन्हा एकदा चर्चा रंगलेली आहे. 2012 पासून इलियाना ही बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे. रणबीर कपूरसोबत तिचा 'बर्फी' हा चित्रपट प्रचंड गाजला होता. त्यानंतर तिनं अनेक मोठ्या बिग बजेट चित्रपटांमधून कामं केली आहेत. त्यामुळे तिचंही तगडं फॅन फॉलोईंग आहे. परंतु काही चित्रपट केल्यानंतर सध्या ती चित्रपटसृष्टीपासून दूर आहे. त्यातून तिच्या गरोदरपणाच्या न्यूजमुळे ती चांगलीच चर्चेत आली आहे. अनेकांनी असं म्हटलं आहे की, हा कतरिनाचा भाऊ सबॅस्टियन आहे. मध्यंतरी ती कतरिना कैफच्या फॅमिलीसोबत वेकेशन मोडमध्ये दिसली होती त्यामुळे तिच्या आणि सेबेस्टियनच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं आहे. 


हेही वाचा - सईनं दौलतरावसोबत केला खास फोटो शेअर; वाढदिवसाच्या शुभेच्छा देत म्हणाली, ''I Heart You''



इलियाना ही आपल्या ज्या मिस्ट्री मॅनसोबत आपले फोटो टाकते आहे त्यावरून चाहते पुरते गोंधळले आहेत. आपल्या मिस्ट्री मॅनसोबतचे असे फोटो टाकत ती फक्त चर्चांमध्ये राहण्याचा प्रयत्न करते आहे. त्यामुळे अनेक जण तिच्यावर टीकाही करताना दिसत आहेत. त्याचसोबत तिच्या मिस्ट्री मॅनची लिंक अनेकांनी आतिफ अस्लिम तर थेट रणबीर कपूरसोबत सुद्धा लावली आहे.