मुंबई : बॉलिवूडमध्ये अनेक हॉट आणि बोल्ड अभिनेत्री असल्या तरी 90च्या दशकातील अभिनेत्रींची जादू आजही चाहत्यांच्या मनात आहे. 90 च्या दशकातील अशीचं एक अभिनेत्री म्हणजे जुही चावला. जुही आज रूपेरी पडद्यापासून दूर असली तरी तिच्या चाहत्यांची संख्या मोठी आहे. अनेक बॉलिवूड अभिनेते आज देखील तिच्या प्रेमात आहे. अशाचं एका अभिनत्याचा खुलासा जुहीने सोशल मीडियाच्या माध्यमातून केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वयाच्या 6व्या वर्षी जुहीच्या प्रेमात असलेल्या अभिनेत्याचं नाव आहे इम्रान खान (Imran Khan). इम्रानने वयाच्या सहाव्या वर्षी जुहीला प्रपोज केलं. जुहीने इमरानला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना जुन्या आठवणी ताज्या केला. 


जुहीने इमरानसोबत काही फोटो शेअर केले आहेत. फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये, 'इम्रानने वयाच्या 6 व्या वर्षी मला प्रपोज केलं.. हिऱ्याची ओळख त्याला लहानपणापासून आहे...' असं तिने लिहिलं आहे. 



इमरानबद्दल सांगायचं झालं तर त्याने लहानपणापासून अभिनयाला सुरूवात केली. 'कयामत से कयामत तक' , 'जो जीता वही सिकंदर' चित्रपटाच्या माध्यमातून त्याने बालकलाकाराची भूमिका साकारली. 


त्यानंतर इमरानने  'जाने तू ... या जाने ना', 'लक',  'आई हेट लव स्टोरीज', 'डेल्ही बेली', 'मेरे ब्रदर की दुल्हन' आणि 'एक मैं और एक तू' यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केलं.