आमिरच्या कुटुंबात घटस्फोटाची रांग; आता कोण होतंय वेगळं?
आमिर खान पाठोपाठ या प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याचा घटस्फोट?
मुंबई : बॉलिवूड अभिनेता आणि आमिर खानचा भाचा इम्रान खानने जाने तू या जाने ना या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर इमरान फारसा चित्रपटात दिसला नाही. 2011 मध्ये या अभिनेत्याने पत्नी अवंतिका मलिकसोबत थाटामाटात लग्न केलं. दोघांमध्ये सगळं काही छान सुरु होतं. आणि त्या दिवसात इमरान त्याची पत्नी अवंतिकाच्या प्रेमात कमालीचा वेडा झाला होता. मात्र, 2019 पासून या दोघांमध्ये भांडण झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत. आता ताज्या रिपोर्टनुसार, दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे.
इम्रान खान आपल्या पत्नीला घटस्फोट देणार!
अहवाल असं म्हटलं आहे की, जवळच्या नातेवाईक आणि मित्रांनी दोघांमध्ये गोष्टी व्यवस्थित करण्यासाठी विविध युक्त्या वापरल्या. विभक्त झालेले इम्रान खान आणि अवंतिका मलिक यांना पुन्हा एकत्र करण्याचा सर्वांनीच प्रयत्न केला. विशेषत: अवंतिकाला तिच्या लग्नाला आणखी एक संधी द्यायची होती पण तिचे कोणतेही प्रयत्न कामी आले नाहीत.
अवंतिकाने लग्न वाचवण्यासाठी केले सर्वतोपरी प्रयत्न
इमरान हे नातं संपवण्याचा विचार करत असल्याच्या बातम्याही आल्या होत्या. पत्नी अवंतिकाने हे लग्न वाचवण्याचा खूप प्रयत्न केले पण तिला यश आलं नाही. आता समोर आलेल्या एका रिपोर्टनुसार हे दोघं अखेर वेगळे होत आहेत. मात्र, दोघांनी अद्याप घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज केलेला नाही.
थाटामाटात लग्न केलं होतं
इम्रानने 2011 मध्ये अवंतिकासोबत लग्न केलं. त्यांना 7 वर्षांची मुलगीही आहे. विभक्त झाल्यानंतर, गेल्या वर्षी मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये एका लग्न समारंभात या दोघांमध्ये एकमेकांशी भिडले. दोघंही २०१९ पासून वेगळे राहत आहेत. दरम्यान, इमरानने ठरवलं आहे की, अवंतिकासोबतचं त्याचं लग्न हा एक बंद अध्याय आहे आणि तो यावर बोलण्यास तयार नाही.