...म्हणून इम्तियाजनं १० वर्षांचं वैवाहिक आयुष्य संपुष्टात आणलं?
इम्तियाज सध्या एका ऑस्ट्रेलियन महिलेच्या प्रेमात आहे
मुंबई : बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक इम्तियाज अली आपल्या रोमान्टिक सिनेमांसाठी प्रसिद्ध आहेच... हा इम्तियाज आता प्रेमात पडलाय... पुन्हा एकदा... होय, नुकतंच इम्तियाज आणि त्याची पत्नी प्रीती अली यांनी एकमेकांशी फारकत घेतलीय... इम्तियाज सध्या एका ऑस्ट्रेलियन महिलेच्या प्रेमात आहे... आणि ही महिला सिनेइंडस्ट्रीतून नाही... इतकंच नाही तर ही महिलादेखील विवाहीत आहे... परंतु, ती सध्या तिच्या पार्टनरपासून विभक्त झालीय... तिला एक १० वर्षांचा मुलगादेखील आहे.
कोण आहे ती?
तिचं नाव आहे सारा टोड... सारा ऑस्ट्रेलियन मास्टरशेफ आहे. गेल्या काही दिवसांपासून इम्तियाज साराला डेट करतोय. सारा-इम्तियाजची भेट भारतातच झाली होती. सारा एक लेखिकाही आहे... तिचं cookbook हे पुस्तक प्रसिद्ध आहे इतकंच नाही तर ती एका रेस्टॉरन्टची मालकीणही आहे.
पतीपासून विभक्त झालेल्या साराचा मुलगा तिच्यासोबतच राहतो. ऑस्ट्रेलियाची रहिवासी असलेली सारा गेल्या काही काळापासून भारतातच राहते. तिचं गोव्यात '२५० सीट' नावाचं एक थीम रेस्टॉरन्ट आहे. सारा आणि
याच नात्यामुळे, इम्तियाज आणि प्रीती यांचं १० वर्षांचं वैवाहिक जीवन संपुष्टात आलंय, असं म्हटलं जातंय. इम्तियाज आणि प्रीती यांना इदा अली नावाची एक मुलगी आहे.