मधुबाला यांच्या बंगल्यावर रात्रभर अभिनेत्रीच्या भुताची वाट पाहायचे इम्तियाज अली; म्हणाले `मला आजही तो अनुभव...`
Imtiaz Ali in Madhubala`s Haunted Bungalow : इम्तियाज अली यांनी नुकत्याच दिलेल्या एका पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी हा खुलासा केला होता.
Imtiaz Ali in Madhubala's Haunted Bungalow : बॉलिवूडचे लोकप्रिय चित्रपट दिग्दर्शक इम्तियाज अली यांनी आजवर अनेक गाजलेले चित्रपट दिले आहेत. आता इम्तियाज अली यांनी एक हॉरर चित्रपट म्हणजे भयपट बनवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्याशिवाय त्यांना या चित्रपट एक सत्य घटना दाखवायची आहे. इम्तियाज अली यांनी एका पॉडकास्टमध्ये याविषयी खुलासा केला. त्याशिवाय त्यांनी सांगितलं की त्यांना या चित्रपटातून प्रेक्षकांना घाबरवायचं नाही तर त्यांना या कथेला ते सगळे जगतील असं करायचं आहे. इम्तियाज अली यांना स्वत: ला भयपट खूप आवडतात आणि त्यांच्या मनात या चित्रपटाविषयी एक कल्पना देखील आहे.
इम्तियाज अली यांनी रणवीर अलाहबादियाच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांना भटपट करायचा असून त्यासाठी त्यांच्या डोक्यात कशी कथा आहे हे देखील सांगितलं. त्यांनी सांगितलं की 'मधुबाला ज्या घरात रहायची त्याचं नाव किस्मत असं होतं. आता तो बंगला राहिला नाही कारण आता तिथे दुसरं काही बनवलं जात आहे. पण आधी त्या बंगल्याला भूत बंगला म्हणायचे. अनेकांन त्या बंगल्यात रात्री शूटिंग करायची इच्छा होती, पण त्यांना परवानगी मिळाली नाही. तर त्यावेळी असं म्हटलं जायचं की मधुबालाचं भूत तिथे राहतं.'
पुढे इम्तियाज अली म्हणाले की 'त्यात किती तथ्य आहे हे मला नाही माहित, पण त्या जागी मला काही तरी जाणवलं होतं. एक दिवस रात्री मी तिथे शूटिंग करण्यासाठी गेलो होतो, तेव्हा मला काही तरी जाणवलं तर मी रोज तिथे जाऊ लागलो. मी एकटाच त्या बंगल्यात जाऊ लागलो होतो. तिथे शांतीत जिथे अंधार आहे त्या कोपऱ्यात जाऊन बसून रहायचो.'
इम्तियाज अली यांनी याविषयी पुढे सांगितलं की 'मला पाहायचं होतं की त्या बंगल्यात खरंच मधुबाला यांचं भूत आहे की नाही. मुळात, मी आत्मावर विश्वास करत नाही, पण मला ती रात्र आजही आठवण आहे जेव्हा मी तिथे जायचो. मी एकदिवस आधी सांगितल्याप्रमाणे अंधारात एका कोपऱ्यात बसलो होतो आणि त्यावेळी फक्त मला भीती वाटली नाही तर त्यासोबत आणखी काही जाणवलं. मला त्यावेळी रोमॅन्टिक जाणवलं आणि तो अनुभव वेगळाच होता.'
मधुबाला यांच्याविषयी बोलायचे झाले तर त्यांनी 40-50 मध्ये हिट चित्रपट दिले होते. त्या जेव्हा 36 वर्षांची होती तेव्हा त्यांचं निधन झालं. 23 फेब्रुवार 1969 मध्ये मुंबई मधुबाला यांचं निधन एका आजारामुळे झालं. काही वर्षांपूर्वी जेव्हा मधुबाला यांची 89वी जयंती होती तेव्हा इम्तियाज अली मधुबाला यांचे फोटो शेअर केला होता. इम्तियाज अली यांनी सांगितलं की त्यांचा आवडता भयपट हा 'मधुमति' आहे. हा चित्रपट 1958 साली प्रदर्शित झाला होता. त्याशिवाय त्यांना त्या सारखंच काही बनवायचं आहे.