इमरान खाननं जंगलात बनवला आलिशान व्हिला! नेटकऱ्यानं विचारलं 'पैसे कुठून आले?' तर सडेतोड उत्तर देत अभिनेता म्हणाला...

Imran Khan Villa : इमरान खाननं सोशल मीडियावर शेअर केलेल्या या व्हिलाचे फोटो प्रचंड व्हायरल झाले आहेत. 

दिक्षा पाटील | Updated: Jun 2, 2024, 10:30 AM IST
इमरान खाननं जंगलात बनवला आलिशान व्हिला! नेटकऱ्यानं विचारलं 'पैसे कुठून आले?' तर सडेतोड उत्तर देत अभिनेता म्हणाला... title=
(Photo Credit : Social Media)

Imran Khan Villa : 'जाने तू... या जाने ना' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदारर्पण करणारा अभिनेता इमरान खानला कोणत्याही ओळखीची गरज नाही. पहिल्याच चित्रपटातूनच इमरान हा नॅशनल क्रश झाला होता. पण काही काळानंतर तो या चित्रपटसृष्टीपासून लांब झाला. पण त्याच्या चाहत्यांची लिस्ट काही कमी झालेली नाही. 

इमरान हा बॉलिवूड किंवा अभिनय क्षेत्रापासून लांब असला तरी देखील सोशल मीडियावर सक्रिय होता. नुकतेच इमराननं त्याच्या आयुष्यातील एका सुंदर काळाविषयी चाहत्यांना सांगितलं. प्रत्येकाचं स्वप्न असतं तेच हे आहे. खरंतर, इमराननं त्याच्या स्वप्नातला आलिशान महाल बांधला आहे. त्याचे फोटो इमराननं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत. त्यात इमराननं एका मोकळ्या मैदानाचा फोटो शेअर केला आहे. तिथेच मध्ये असलेलं त्याचं हे आलिशान घर. हे सगळं जंगलाच्या मधोमध असून मागे डोंगर दिसत आहे. इमराननं कशा प्रकारे हे घर बांधलं याविषयी देखील या पोस्टमध्ये सांगितलं आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

त्याच्या या आलिशान घराचे फोटो शेअर करत इमराननं कॅप्शन दिलं की 'तर गेल्या काही वर्षात मी जे काम केलं. त्यापैकी एक म्हणजे घर बांधनं. खरंतर मी काही चित्रपटांमध्ये एक आर्किटेक्चरची भूमिका साकारली होती. पण खऱ्या आयुष्यात कोणतीही ट्रेनिंग किंवा एक्सपर्ट असल्याचा दिखावा मी करु शकत नाही. पण मला गोष्टी बनवायला आणि शिकायला खूप आवडतं. मी ही साईट निवडली कारण ही खूप सुंदर आहे. जवळपास दोन नद्या आणि डोंगर या सगळ्याच्या अगदी खाली ही जाहा आहे.... आणि अगदी समोरच सुर्यास्त देखील होतो. मला हे जाणवलं की लॅन्डस्केपनुसार, घराला डिझाइन करणं योग्य असेल. माझे प्रयत्न हे एक आलिशान हॉलिडे व्हिला बनवनं नव्हतं, तर असं काही बनवायचं होतं जे लॅन्डस्केपनं प्रेरित असेल. घराचा अर्थ फक्त व्ह्यू असनं नाही, हे एक आश्रम आहे जिथून तुम्ही निसर्गाचं सौंदर्या पाहून त्याची स्तुती करू शकता.' 

इमराननं घर बनवण्यासाठी त्यानं या जागेचा कसा अभ्यास केला ते सांगितलं. तो म्हणाला, 'पहिल्या वर्षी मी सूर्योदय आणि सुर्यास्त, पाऊस येतो तेव्हा झऱ्याचा प्रवाह कसा आणि त्यासोबत जसे ऋतू बदलतात तसे काय बदल होतात हे पाहण्यासाठी वेळ दिला, जेणे करून मला त्या पद्धतीनं घर डिझाइन करणं सोप होऊ शकतं. माझ्या कंत्राटदाराशी आणि स्ट्रक्चरल इंजिनीअरशी या बाबतीत चर्चा केल्यानंतर मी काँक्रीट स्लॅब बांधण्याचा निर्णय सोडून दिला. त्याऐवजी त्यांनी आजूबाजूच्या गावांमध्ये घरे बांधण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या क्लासिक पद्धतीचा अवलंब केला. पायासाठी दगडी प्लिंथ, एकमजली विटांच्या भिंती, स्टीलच्या छतासाठी बीम आणि प्री-फॅब्रिकेटेड इन्सुलेटेड छतावरील शीट. बस एवढेच.'

Imran Khan Slams Troll Asking From Where He Is Getting Money To Build A Villa in The Middle Of Nature

किती आला खर्च?

इमरान खाननं पुढे त्याला हे आलिशान घर बांधण्यासाठी आलेल्या खर्चाविषयी सांगितलं की 'ज्या व्हिलांच्या मी जाहिरात पाहतो, जे व्हिला आधीपासून तयार असतात त्या व्हिलाच्या तुलनेत मला खूप कमी पैसे लागले. तर मला आश्चर्य होतंय की मार्कअप कुठे जातंय?' 

नेटकऱ्यानं केलं ट्रोल

इमराननं ही पोस्ट शेअर करताच काही नेटकऱ्यांनी त्याची स्तुती केली आणि त्याच्या या स्किलसाठी त्याला शुभेच्छा दिल्या. तर दुसरीकडे एका नेटकऱ्यानं त्याला ट्रोल करत म्हटलं की 'त्याला एवढं पैसे कुठून मिळतात?' तर इमराननं त्या नेटकऱ्याला सडेतोड उत्तर देत 'मी काही वर्ष काही चित्रपटांमध्ये काम केलं आहे.'