मुंबई : कार्तिक आर्यन आणि सारा अली खान ही जोडी 'लव आजकल'च्या सिक्वलमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन इम्तियाज अली यांनी केलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेलं चित्रपटाचं शूटिंग पूर्ण करण्यात आलं आहे. परंतु तरीही चित्रपटाचं नाव निश्चित करण्यात आलं नव्हतं. मात्र आता दिग्दर्शक इम्तियाज अली यांनी 'लव आजकल'च्या सिक्वलच्या नावाची घोषणा केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सारा-कार्तिक शूटिंग करत असलेल्या चित्रपटाचं नाव 'लव आजकल २' असल्याचा अंदाज लावला जात होता. मात्र इम्तियाज अली यांनी या चित्रपटासाठी 'आजकल' हे शिर्षक दिलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या अनेक दिवसांपासून 'आजकल' चित्रपटाचं शूटिंग सुरु आहे. चित्रपटात सारा आणि कार्तिक प्रमुख भूमिका साकारत आहेत. सारा-कार्तिक शूटिंगदरम्यानचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करत होते. आता इम्तियाज अली यांनी सारा-कार्तिकचा एक फोटो शेअर करत, कॅप्शनमधून चित्रपटाच्या शिर्षकावर शिक्कामोर्तब केला आहे. 



कार्तिक आर्यन आणि सारा अली खान यांचा आगामी चित्रपट 'आजकल' सैफ अली खान आणि दीपिका पादुकोण स्टारर 'लव आजकल'चा सीक्वल आहे. सारा, कार्तिकशिवाय चित्रपटात रणदीप हुड्डादेखील भूमिका साकारणार आहे. 'आजकल' १४ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.