Pushpa 2 Allu Arjun, David Warner : दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनच्या 2021 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'पुष्पा : द राइज' या चित्रपटानं प्रेक्षकांची मने जिंकली. या चित्रपटाचे चाहते फक्त भारतात नाही तर परदेशातही आहेत. या चित्रपटासाठी अल्लू अर्जुनला नॅशनल अवॉर्ड देखील देण्यात आला होता. आता तब्बल तीन वर्षांनंतर त्याचा सीक्वल 'पुष्पा 2 : द रूल' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सगळ्यात आता अशी चर्चा सुरु आहे की या चित्रपटाला एक दिग्गज क्रिकेट देखील पाहायला मिळणार आहे. त्याची हिंट स्वत: या क्रिकेटरनं दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपण चर्चा करत आहोत ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरची. डेव्हिड वॉर्नर हा पुष्पा या चित्रपटाचा किती मोठा चाहता आहे हे कोणालाही सांगायची गरज नाही. जेव्हा पासून हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. डेव्हिड वॉर्नर हा अल्लू अर्जुनचे चित्रपटातील सीन्स रिक्रिएट करताना दिसत आहे. तर डेव्हिड वॉर्नरनं पुष्पराज स्टाईलमध्ये सगळ्यांची मने जिंकली. आता त्यानं या चित्रपटाच्या सीक्वलची त्याला असलेली आतुरता जाहिर केली आहे. त्यासोबत पाहुण्या कलाकाराच्या त्याच्या भूमिकेची हिंटही दिली आहे. 



खरंतर अल्लू अर्जुननं नुकतीच त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून 'पुष्पा 2' चा पोस्टर शेअर केला. त्यात त्याचा अल्लू अर्जुनच्या हातात त्रिशूल असल्याचे पाहायला मिळते. इतकंच नाही तर सगळीकडे कुंकू उधळल्याचे पाहायला मिळते. हे पोस्टर शेअर करत त्यानं कॅप्शन दिलं की 8 एप्रिलला चित्रपटाचा टीझर येणार आहे. याच पोस्टवर डेव्हिड वॉर्नरनं कमेंट केली आहे. डेव्हिड वॉर्नर कमेंट करत म्हणाला, "पाहुण्या कलाकाराची भूमिका" आणि त्यानं हसण्याचे इमोजी देखील शेअर केले आहेत. डेव्हिड वॉर्नरच्या कमेंटनं सगळ्यांचेच लक्ष वेधले आहे. 



हेही वाचा : आलिया-रणबीरची लाँग ड्राईव्ह नाही तर... 8 कोटींच्या गाडीची नंबर प्लेट चर्चेत, दडलंय खास कनेक्शन


दरम्यान, डेव्हिड वॉर्नरच्या कमेंटनं हे सत्य आहे की तो मस्करी करतोय हे कळत नाही आहे. आता एकतर हे उद्या टीझर आल्यावर कळेल किंवा मग चित्रपट प्रदर्शित झाल्यावर. पण डेव्हिडनं केलेल्या या कमेंटनं सगळ्यांची उत्सुक वाढवली आहे. इतकंच नाही तर स्वत: डेव्हिडनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पोस्टर शेअर करत टीझरनं 'आतुरतेनं प्रतिक्षा' करतोय असं सांगितलं.  तर हा चित्रपट 15 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.