मुंबई : सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणानंतर बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या आयुष्यात मोठा बदल झाला. त्यानंतर तिने आपले जीवन अनेक प्रकारे बदलण्याचा  प्रयत्न केला. पण याकाळात तिला लोकांकडून बरीच टीकाही सहन करावी लागली. सोशल मीडियावर तिला लक्ष्य करण्यात आले आणि ट्रोल करण्यात आले. अगदी  चेहरे या चित्रपटावर रिया चक्रवर्ती त्यात असल्यामुळे बहिष्कारही टाकण्यात आला होता. पण आता रिलीज झालेल्या चेहरे या सिनेमाच्या नवीन टीझरवरून हे स्पष्ट  झाले आहे. की रिया हा सिनेमाचा एक महत्त्वाचा भाग आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिया चक्रवर्तीचा नवा सिनेमा


बिग बी अमिताभ बच्चन यांनी नुकताच इन्स्टाग्रामवर चित्रपटाचा एक नवीन टीझर शेअर केला आहे. 23 सेकंदाच्या या टीझरमध्ये अमिताभ बच्चन यांचा एक  डायलॉग ऐकू येत आहे. ज्यात ते न्यायाबद्दल बोलत आहेत. या दरम्यान रिया चक्रवर्ती मेणबत्ती पेटवताना दिसत आहे. अमिताभचा संवाद ऐकून इम्रान हाश्मी थोडा  घाबरलेला दिसतो आहे.


आतापर्यंत रिया चक्रवर्ती चित्रपटाच्या कोणत्याही प्रमोशनल इव्हेंटमध्ये दिसली नव्हती. ता तिची एंट्री दाखवण्यात आली आहे. या छोट्या टीझरमध्ये चित्रपट रिलीज  होण्याच्या काही दिवस आधी रिया दोनदा दिसली आहे.



जितके चेहरे तितके मुखवटे 


चित्रपटाचा हा टीझर शेअर करण्याबरोबरच अमिताभ बच्चन यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की - जितके चेहरे, तितके मुखवटे, दोषी फक्त एक दोषी हजार? 27 ऑगस्ट  रोजी चित्रपटगृहांमध्ये चेहरे सिनेमा पहा. या चित्रपटाच्या टीझरने नक्कीच चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. चाहते खूप उत्साहित आहेत. लवकरच गाणी रिलीज करण्याची  चाहत्यांनी विनंती केली आहे. त्याच वेळी, काही चाहते या चित्रपटाच्या सस्पेन्सशी लवकरच परिचित होण्यासाठी हतबल झाले आहेत.या सिनेमात रिया चक्रवर्ती अभिनेता इमरान हाश्मीसोबत बोल्ड सीन करताना दिसणार आहे. दोघांचा रोमान्स स्क्रिनवर पाहायला मिळणार आहे.



मल्टीस्टारर चित्रपट


चेहरे या चित्रपटाचे दिग्दर्शन रुमी जाफरी करत आहेत आणि निर्मिती आनंद पंडित आहेत. हा चित्रपट 27 ऑगस्ट 2021 रोजी रिलीज होत आहे. लॉकडाऊन टप्प्यात
चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत असलेल्या काही चित्रपटांपैकी हा एक आहे. चित्रपटात अमिताभ, रिया आणि इमरान व्यतिरिक्त अनु कपूर, रघुबीर यादव आणि क्रिती  खरबंदा महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत.