मुंबई : क्रिती सेनन एक लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री आहे. तिच्या 7 वर्षांच्या कारकिर्दीत, क्रिती सॅननने अनेक मोठ्या चित्रपट निर्माते आणि कलाकारांसोबत काम केले आहे. क्रितीने अनेक सिनेमे साईन देखील केले आहेत. त्यामुळे तिच्याकडे आगामी चित्रपटांची भलीमोठी रांग आहे. नुकत्याच एका मुलाखतीदरम्यान क्रिती सेननला चित्रपट विश्वाशी संबंधित अनेक प्रश्न विचारण्यात आले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

RAPID FIRE : क्रितीला विचारण्यात आले मजेदार प्रश्न


या मुलाखतीत क्रिती सॅननला काही प्रश्नाचे अगदी वेगवान रित्या  उत्तर द्यायची होती. येथे अभिनेत्रीला खूप मजेदार प्रश्न विचारण्यात आले. पण क्रिती सेननला काही उत्तर देणे खूप कठीण झालं होतं.


क्रितीला विचारण्यात आले की तिला 100 कोटीचा चित्रपट आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार यामध्ये काय निवडायला आवडेल. यावर अभिनेत्रीने अगदी जबरदस्त उत्तर दिलं. क्रिती सेननने सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार निवडला.


क्रिती सेननने सांगितले की तिला अॅक्शनपेक्षा कॉमेडी चित्रपटांमध्ये काम करायला आवडतं. कारण विनोद करणं कठीण आहे, कोणालाही हसवणे सोपे नाही.



जेव्हा क्रिती सेननला विचारण्यात आले की, रणबीर कपूर आणि रणवीर सिंग यांपैकी कोणासोबत तुला चित्रपट करायला आवडेल? याचे उत्तर देताना क्रिती बरीच गोंधळलेली दिसत होती. क्रितीने सांगितले की, ती याचे उत्तर देऊ शकणार नाही. दोन्ही कलाकार जबरदस्त असल्यामुळे तिला दोघांसोबत काम करायला आवडेल.