मुंबई : स्मॉल स्क्रिनवरील चला हवा येऊ द्या या कार्यक्रमावर प्रेक्षक भरभरून प्रेम करतात. सुरुवातीपासूनच या कार्यक्रमाला आणि त्यातील विनोदवीरांना महाराष्ट्राच नव्हे तर संपूर्ण जगाभरातील रसिक प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून घेतलं आहे. काही क्षणासाठी हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू उमटवतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मराठी कलाकारच नाही तर हिंदी सेलिब्रिटी देखील या मंचाची हजेरी लावतात. नुकतीच झी टीव्हीवर सुरु होणाऱ्या 'झी कॉमेडी फॅक्टरी' या नवीन कार्यक्रमाच्या टीमने हवाच्या मंचावर हजेरी लावली. 



फराह खान, डॉक्टर संकेत भोसले, सुगंध मिश्रा, पुनीत पथक आणि तेजस्वी प्रकाश या कलाकारांनी या मंचावर हजेरी लावली. या कलाकारांच्या उपस्थितीत नेहमीप्रमाणे चला हवा येऊ द्या च्या सर्व विनोदवीरांनी कल्ला केला. त्यांचं जबरदस्त सादरीकरण पाहून या सर्व कलाकारांना हसू अनावर झालं. 


फराह खान चला हवा येऊ द्या च्या मंचावर पहिल्यांदाच आल्या आणि या कार्यक्रमात सहभागी होण्याचा अभनुव शेअर करत फराह खान म्हणाल्या, "मला चला हवा येऊ द्या मध्ये येऊन खूप छान वाटलं आणि भरपूर मजा आली. इकडे येऊन वेळ कसा गेला कळलंच नाही. मराठी विनोदी कलाकारांचं कॉमिक टायमिंग हे कमाल असतं आणि हा त्यांचा गुणधर्म आहे असं मला वाटतं." 


संपुर्ण हवा येऊच्या विनोदवीरांचं फराह खान यांनी कौतुक केलं.