Dangal मधील छोटी बबिता आज दिसते इतकी बोल्ड, फोटो पाहून तुम्हीही प्रेमात पडाल
असे अनेक बॉलीवूड चित्रपट आहेत ज्यात छोट्या पात्रांनी चित्रपटात आपल्या स्टाईलने आणखीनच बहार आणली आहे.
मुंबई : बॉलीवूड असो किंवा टीव्ही मोठ्यांसह बालकलाकारांच्या पात्रांनीही आपल्या स्टाईलने आणि दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या हृदयात आपले स्थान निर्माण केले आहे.
असे अनेक बॉलीवूड चित्रपट आहेत ज्यात छोट्या पात्रांनी चित्रपटात आपल्या स्टाईलने आणखीनच बहार आणली आहे.
असाच एक चित्रपट म्हणजे दंगल. या चित्रपटात आमिर खान आणि साक्षी तन्वर मुख्य भूमिकेत होते, मात्र हा चित्रपट कुस्तीपटू गीता-बबिता यांच्यावर चित्रित करण्यात आला होता.
चित्रपटातील गीता-बबिता यांची व्यक्तिरेखा, शैली आणि संवादांनी चित्रपटाला जीवदान दिले. चित्रपटात गीताची भूमिका झायरा वसीमने तर बबिताची भूमिका सुहानी भटनागरने केली होती.
त्याचवेळी, चित्रपटाची छोटी कलाकार गीता बबिता मोठी झाली आहे. अलीकडे बबिता म्हणजेच सुहानी भटनागरचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
या फोटोंमध्ये बबिता उर्फ सुहानी भटनागरचा लूक पूर्णपणे बदलला आहे. हे फोटो पाहून चाहत्यांनाही त्यांच्या डोळ्यांवर विश्वास बसत नाहीये. एका युजरने लिहिले - किती बदलले इतके सुंदर, तर दुसऱ्या यूजरने लिहिले - विश्वास बसत नाही की ही तीच मुलगी आहे.
सुहानी भटनागरबद्दल सांगायचे तर, तिने लहानपणापासूनच अभिनय क्षेत्रात प्रवेश केला होता. तिने आपल्या करिअरची सुरुवात जाहिरातींमधून केली.
सुहानीचे शालेय शिक्षण फरिदाबादच्या दिल्ली पब्लिक स्कूलमधून झाले. सुहानीला एक भाऊही आहे. अभिनयासोबतच सुहानीला गाण्याची आणि नृत्याचीही आवड आहे. बॉलिवूड चित्रपट दंगल हा तिचा डेब्यू चित्रपट आहे.