मुंबई : नव वर्षाच्या सुरवातीला एकापेक्षाएक सिनेमांनी चाहत्यांचे मनोरंजन केले. या सुपरहिट सिनेमांच्या यादीत आता दिग्दर्शक करण जोहरचा 'कलंक' सिनेमाचा समावेश होताना दिसत आहे. 'कलंक' सिनेमाची कथा एका ऐतिहासिक गोष्टीवर बेतलेली आहे. आणि सिनेमात सुपरस्टार असणार आहेत तर अशी तगडी स्टारकास्ट असलेला सिनेमा 17 एप्रिल रोजी सिनेमागृहात दाखल होणार आहे. सिनेमात अभिनेत्री माधुरी दीक्षित, आलिया भट्ट, सोनाक्षी सिन्हा त्याचप्रमाणे अभिनेता संजय दत्त, वरूण धवण, आदित्य राय कपूर झळकणार आहेत. बहुप्रतिक्षीत 'कलंक' सिनमाचा टिझर प्रदर्शित करण्यात आला आहे. टिझर प्रदर्शित झाल्यानंतर चाहत्यांमध्ये सिनेमाची उत्कंठा शिगेला पोहचली आहे. काही दिवसांपूर्वी सिनेमातील कलाकारांचे फर्स्ट लूक सोशल मीडियाच्या माध्यमातून जारी करण्यात आले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिग्दर्शक, निर्माते, कलाकार सिनेमाचे जोरदार प्रमोशन करताना दिसत आहेत. सिनेमातील कलाकारांचे नवनवे लूक समोर येत आहेत. नुकताच संजय - माधुरीचा रिअल अवतार फोटो जारी करण्यात आला आहे. ट्रेड अॅनलिस्ट तरण आदर्श यांनी स्वत:च्या ट्विटर अकाउंटवरून संजय - माधुरीचा नवीन लूक प्रदर्शित केला.



 



संजय - माधुरी मोठ्या कालावधी नंतर मोठ्या पडद्यावर एकत्र झळकताना दिसणार आहेत. तब्बल 21 वर्षांनंतर बॉलिवूडची ही जोडी चाहत्यांचे मनोरंजन करण्यास सज्ज झली आहे. त्याकाळात संजय - माधुरीच्या नात्याच्या चर्चांना चांगलेच उधान आले होते. ते एकमेकांना डेट करत असल्याचे देखील समोर येत होते. दिग्दर्शक अभिषेक वर्मन दिग्दर्शित सिनेमा बॉक्स ऑफिसवर किती मजल मारेल हे पाहणे औत्सुक्याचं असणार आहे.