मुंबई : बॉलिवूड स्टार सलमान खानचे लाखो चाहते आहेत. त्याचे सोशल मीडियावर कित्येक फॅन पेज देखील आहेत. सोशल मीडियावर तो खूपच सक्रिय असतो. सध्या सलमान एका शोसाठी दुबईला गेला आहे. पण तिथल्या एका व्हिडिओमुळे तो खूप ट्रोल होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 त्याचा एक डान्स व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ 'दबंग द टूर रिलोडेड' ( Da-Bang The Tour Reloaded ) मधील आहे, ज्यामध्ये तो पूजा हेगडेसोबत 'जुम्मे की रात' गाण्यावर हुकस्टेप करताना दिसत आहे.


सध्या सलमान खानसोबत पूजा हेगडे, दिशा पटानी, सोनाक्षी सिन्हा आणि इतर अनेक सेलिब्रिटी या 'दबंग द टूर रिलोडेड'साठी ( Da-Bang The Tour Reloaded ) दुबईमध्ये आहेत.


त्याचे बरेच व्हिडिओ आणि फोटो समोर आले आहेत आणि चाहते ते सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल करत आहेत.


त्यातीलच एका  व्हिडिओ सगळ्यांनाच चकीत करणारा आहे. कारण या व्हिडिओत जुम्मे की रात गाण्यावर हुकस्टेप करण्याच्या नादात सलमानचा अभिनेत्रीला चुकीच्या ठिकाणी हात लागतो.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


सलमान पूजा हेगडेचा ड्रेस धरण्याचा प्रयत्न करतो, पण भर स्टेजवर काही वेगळंच घडतं. हा सगळा प्रकार कॅमेरात कैद झाला आहे आणि त्यानंतर समोर आलेल्या व्हिडिओमुळे तो चांगलाच ट्रोल होत आहे.