मुंबई : संपूर्ण जगाला आपल्या अभिनयाने दखल घ्यायला भाग पाडणारी लोकप्रिय जोडी 'आर्ची आणि परश्या' आजही या जोडीची जादू आपल्याला प्रेक्षकांमध्ये पहायला मिळते. रिंकू आणि आकाश ही जोडी 'सैराट' आणि झुंड सिनेमातून मोठ्या पडद्यावर झळकली.  ही जोडी पहिल्यांदा प्रेक्षकांच्या भेटीला आली. ती म्हणजे नागराज मंजुळेच्याच सिनेमातून.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिंकू राजगुरुने सैराट सिनेमात आर्चीची भूमिका साकारली होती. त्यानंतर रिंकू राजगुरु हिने कधीच वळून पाहिले नाही. रिंकू राजगुरुची लोकप्रियता या चित्रपटानंतर एवढी वाढली की, तिला बॉडीगार्ड घेऊन फिरावे लागायचे. सैराट चित्रपटानंतर रिंकू राजगुरू आपल्याला कागर या चित्रपटात दिसली. त्याचप्रमाणे काही वेब सिरीज मध्ये देखील तिने काम केलं आहे.  


काही दिवसांपूर्वी रिंकू तिचा सहकलाकार आकाश ठोसरसोबत डिनरसाठी गेल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. हे फोटोही रिंकूने सोशल मीडियावर शेअर केले होते. या फोटोनंतर अनेकांनी या दोघांना ट्रोल देखील केले होते. तर काहींनी यांची रेशीम गाठ जुळतेय का असे प्रश्न उपस्थित केले.


आकाश ठोसरचं सोशल मीडियावर खूप मोठं फॅनफॉलोईंग आहे.  या दोघांनी डिनरचे फोटो शेअर करताच अनेक जण या दोघांमध्ये काहीतरी शिजत असल्याचं सांगत आहेत. रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसर यांनी अलीकडेच आलेल्या झुंड या चित्रपटात देखील काम केलं होतं. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा चालला नाही. मात्र रिंकू आणि आकाशच्या अभिनयांच सगळीकडून कौतूक झालं.


या दोघांच्या जरी डेटिंगच्या चर्चा सुरु असल्या तरी या सगळ्यावर अर्चीने मौन तोडलं आहे. एका लाईव्ह सेशन दरम्यान एका चाहत्याने रिंकू तु सिंगल आहेस का असा प्रश्न विचारला यावंर उत्तर देत रिंकू म्हणाली, माझा कोणी बॉयफ्रेंड नसून मी अद्यापतरी सिंगल आहे असं उत्तर रिंकूने दिलं. 


रिंकू आणि आकाश एकमेकांचे खूप चांगले मित्र-मैत्रिण आहेत. लवकरच रिंकूचा नवा सिनेमा 'आठवा रंग प्रेमाचा' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.