मुंबई : सेलिब्रिटी टेलिव्हिजन कपल्सचा स्पेशल रिअ‍ॅलिटी शो 'स्मार्ट जोडी' सुरू झाला आहे. या शोमध्ये 10 सेलिब्रिटी कपल्स सहभागी झाले आहेत. शोमध्ये एक कपल हे जे सर्वात जास्त चर्चेत आहे. अर्जुन बिजलानी पत्नी नेहा स्वामीसह शोमध्ये सहभागी झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अर्जुन आणि नेहा शोमध्ये खूप धमाल करताना दिसत आहेत. या आठवड्यात शोमध्ये अर्जुन आणि नेहा पुन्हा एकदा लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. त्यांचे हे लग्न खूप खास असणार आहे. अर्जुन आणि नेहाच्या पुनर्विवाहाचा व्हिडिओ समोर आला आहे.


स्मार्ट जोडी या रिअ‍ॅलिटी शोचा नवीन प्रोमो समोर आला आहे. ज्यामध्ये दोघे पुन्हा एकदा स्टेजवर लग्न करताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये अर्जुन नेहाच्या मागणीनुसार सिंदूर लावतो आणि सात फेरे घेतो.


तो म्हणतो की तुम्ही मला दिलेला व्हिडिओ हाच माझ्या लग्नाचा व्हिडिओ असेल. खरं कारण सांगू तर माझ्या लग्नाचा व्हिडिओ नंतर गायब झाला होता.



या शोमध्ये अंकिता लोखंडे पती विकी जैनसोबत लग्नबंधनात अडकते. ती देखील पुन्हा एकदा लग्न करते. या शोमध्ये आलेले सेलिब्रिटी कपल पुन्हा विवाहबंधनात अडकताना पाहायला मिळत आहेत. नुकतेच अंकिताने काही फोटोदेखील शेअर केले आहेत.