मुंबई : स्मॉल स्क्रिनवरील 'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेत गौरी-जयदीपच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने सुख येणार आहे. दोघांनी एकमेकांवरच्या प्रेमाची कबुली दिल्यानंतर आता ते पुन्हा विवाहबंधनात अडकणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिर्केपाटील कुटुंबात प्रत्येक समारंभ अगदी थाटामाटात पार पडतो. त्यामुळे जयदीप-गौरीचं लग्नही अगदी शाही थाटात पार पडत आहे. प्री वेडिंग फोटोशूटपासून, मेहंदी, संगीत, हळद आणि वरात असा सगळा थाट लग्नात पाहायला मिळेल.



नऊवारी साडीत गौरीचं सौंदर्य आणखीनच खुलून आलंय. तर जयदीपही धोतर, फेटा अश्या पारंपरिक लूकमध्ये दिसणार आहे. माई-दादा गौरीला मुलीप्रमाणे मानतात.



त्यामुळे लग्नात गौरीच्या आई-वडिलांची जबाबदारी माई-दादांनीच पार पाडली आहे. या सगळ्यात विशेष लक्ष वेधून घेतंय ते गौरीचं मंगळसूत्र. 


जयदीपच्या प्रेमाची निशाणी असलेलं मोरपीस गौरीने लहानपणापासून जपून ठेवलं होतं. हीच निशाणी तिच्या मंगळसूत्रामध्येही जपली जाणार आहे. लवकरच प्रेक्षकांना हे खास क्षण अनुभवता येणार आहेत.