मुंबई : छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय टीव्ही कार्यक्रमांपैकी एक असलेल्या 'तारक मेहता का उल्टा चश्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chasmah) लोकांच्या घराघरात पाहायला मिळतो आणि या कार्यक्रमामधील किस्स्ये देखील आपण नेहमीच एकमेकांसोबत शेअर करत असतो. त्याचबरोबर या कार्यक्रमात काय काय घडते हे देखील जाणून घेण्यासाठी आपण नेहमीच उत्सूक असतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या मालिकेतील गोकुळधाम सोसायटीमधील लोकं सध्या एका विचित्र परिस्थितीत अडकले आहेत. ज्यामुळे त्यांना जवळजवळ 50 हजार रुपयांचा फाईन भरावा लागणार आहे.


खरेतर  'तारक मेहता का उल्टा चश्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chasmah) या कार्यक्रमाच्या एका भागाची सुरवत होते ती भिडेंपासून. भीडे आंबे काढण्यासाठी एका झाडावर चढतो. तेव्ही गोपी त्याच्या फोनवर पँट फाटल्याचा आवाज लावतो ​​आणि पँट भीडेची पँट फाटली असल्याचे त्याला सांगतो.


त्यामुळे झाडावर चढलेला भिडे खाली उतरतो. त्यानंतर पँट फाटली नाही हे पाहून तो पुन्हा मेहनत करून पुन्हा झाडावर चढला. वर चढल्यानंतर भिडे सर्वांसाठी आंबे तोडतो. सर्वांना हे आंबे पाहून आनंद होतो. परंतु गोली त्याला आणखी जास्त आंबा तोडण्यासाठी सांगतो. परंतु भिडेने अधिक लोभ करु नये नाही तर ते महागात पडेल असे इतर लोकं त्याला समजावतात.


5 हजार रुपयांचा आंबा
गोकूळधाम सोसायटीमधील लोकं भिडेला समजावत असतात तो पर्यंत जीयाची एन्ट्री होते आणि ती आंबा तोडल्यामुळे प्रत्येक आंब्यासाठी 5 हजार रुपये दंड भरावा लागणार असल्याचे सांगते. ती सांगते की, हे झाड रिसॉर्टच्या मालकाची कौटुंबिक मालमत्ता आहे.


ती पुढे सांगते की, रिसॉर्टच्या मालकाच्या वडिलांनी हे झाड लावले आहेत. या झाडाचे आंबे दरवर्षी त्यांच्या कुटुंबाला पाठवले जातात. त्यावेळेस अय्यर तोडलेल्या आंब्यांची आणि पैशांची मोजणी करतो. तेव्हा त्याला समजते की, त्यांना आता या तोडलेल्या सगळ्या आंब्यांची भरपाई म्हणून 50 हजार रुपये द्यावे लागणार आहे.


त्यावर जियाने पळून जाण्याचा मार्ग सांगितला
सर्व गोकूळधाममधील लोकं आपले आंबे भिडे यांना परत देतात आणि ते एकमेकांवर आरोप करण्यासही देखील सुरुवात करतात.


तेव्हा जीयाने हस्तक्षेप केला आणि पोपटलालला सांगितले की, ते तिचे सर्व खास पाहुणे असल्याने त्या रिसॉर्टच्या मालकाशी ती बोलेल आणि कोणालाही दंड भरावा लागणार नाही. हे ऐकून प्रत्येकजणांना सुटकेचा श्वास सोडला.