डिसेंबर महिन्यात वरूण चढणार बोहल्यावर?
अभिनेता वरूण धवन आणि त्याची गर्ल फ्रेंड नताशा दलाल लवकरच विवाह बंधनात अडकणार असल्याच्या चर्चा वाऱ्यासारख्या पसरत आहेत.
मुंबई : सध्या बॉलिवूडमध्ये लग्नाचे वारे वाहत आहेत. रणवीर आणि दीपिकाच्या लग्नानंतर प्रिंयका चोप्रा आणि निक जोनस विवाह बंधनात अडकले. त्यानंतर चर्चा होत होती ती म्हणजे रणबीर आणि आलियाच्या लग्नाची. तर हे जोडपे 'ब्रम्हास्त्र' सिनेमाच्या प्रदर्शनापूर्वी साखपुडा उरकणार असल्याच्या चर्चांना उधान आले होते. आता अभिनेता वरूण धवन आणि त्याची गर्ल फ्रेंड नताशा दलाल लवकरच विवाह बंधनात अडकणार असल्याच्या चर्चा वाऱ्यासारख्या पसरत आहेत.
दिग्दर्शक करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' चॅट शो मध्ये वरूणने त्याच्या आणि नताशाच्या नात्याला दुजोरा दिला होता. सूत्रांनी सांगितल्या नूसार वरूण - नताशा डिसेंबर मध्ये लग्न करणार असल्याच्या चर्चा रंगत आहेत. परंतू या कपलने आणि त्यांच्या कु़टुंबाने याबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. तर आता वरूण कधी बोहल्यावर चढतो हे पाहणे औच्यूक्याचे ठरणार आहे.
वरूणचा बहुप्रतिक्षीत सिनेमा 'कलंक' लवकरच चाहत्याच्या भेटीला येणार आहे. आलिया भट्ट, माधुरी दीक्षित, संजय दत्त आणि आदित्य रॉय कपूर मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. त्यनंतर 'स्ट्रीट डान्सर' सिनेमात अभिनेता वरून धवन आणि अभिनेत्री श्रध्दा कपूर मुख्य भूमिका साकारणार आहेत.