मुंबई : 'फुलपाखरू' आणि 'मन उडू उडू झालं' या मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अभिनेत्री हृता दुर्गुळे हिनं प्रियकर प्रतीक शाह याच्यासोबत असणाऱ्या नात्याला नवी ओळख दिली आहे. लाखोंच्या मनावर राज्य करणारी ही मनांची राणी हृता आता मिसेस हृता प्रतीक शाह म्हणून ओळखली जात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नातेवाईक आणि काही मित्रपरिवाराच्या उपस्थितीत हृता आणि प्रतीकचा विवाहसोहळा पार पडला. सोशल मीडियावरही तिनं लग्नातील काही खास क्षण चाहत्यांच्या भेटीला आणले. मात्र जशी हृताच्या लग्नाची चर्चा होत आहे तशीच चर्चा तिच्या हनिमूनची होत आहे. लग्नानंतर हृता तुर्कीमध्ये हनिमूनला गेली आहे. हृता तुर्कीमधून नवरा प्रतिक शाहासोबत फोटो आणि व्हिडिओ शेअर करताना दिसत आहे. हृतासोबतच चर्चा आहे ती म्हणजे तिचा पती प्रतिक शाहाची. तो कोण आहे आणि काय करतो असे अनेक प्रश्न  हृताच्या चाहत्यांना पडताना दिसतात. पण आज आम्ही तुम्हाला प्रतिक शाहाबद्दल सांगणार आहेत.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


कोण आहे हृताचा पती, प्रतीक शाह ? 
हिंदी मालिका विश्वात अतिशय लोकप्रिय असणाऱ्या अभिनेत्री मुक्ता शाह यांचा मुलगा म्हणजे प्रतीक. बऱ्याच हिंदी मालिकांचं दिग्दर्शन तो करतो.  'तेरी मेरी इक जिंदगी', 'बेहद २', 'बहु बेगम', 'कुछ रंग प्यार के ऐसे भी', 'एक दिवाना था' या मालिकांची नावं त्याच्यासोबत जोडली जातात.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


हृता आणि प्रतीची ही जोडी पाहता त्यांच्या प्रेमाच्या मालिकेचीही दणक्यात सुरुवात झाली आहे. ज्याच्या दिग्दर्शनाची धुरा नेमकी कोणाच्या हाती असणार हे मात्र येणारा काळच ठरवणार आहे.