भर लग्नमंडपात सलमानच्या बहिणीने होणाऱ्या नवऱ्याला दिली धमकी?
फिल्म इंडस्ट्रीमध्ये अशी अनेक जोडपी जी नेहमीच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतात.
मुंबई : फिल्म इंडस्ट्रीमध्ये अशी अनेक जोडपी जी नेहमीच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतात. त्यातील एक जोडी म्हणजे अर्पिता खान आणि आयुष शर्मा यांची.
या जोडीचे फोटो बऱ्याचदा सोशल मीडियावर व्हायरल होताना पाहायला मिळतात. अनेकदा ते चाहत्यांचे लक्ष वेधून घेतात. आता त्यांच्याशी संबंधित एक जुना किस्सा समोर आला आहे.
वास्तविक, नुकत्याच झालेल्या एका संवादादरम्यान खुद्द सलमान खानची बहिण अर्पिता हिचा नवरा आयुष शर्माला त्याच्या लग्नाशी संबंधित एक किस्सा आठवला. तो त्याने मुलाखतीदरम्यान सांगितला,
आयुष्य म्हणाला की, 'मला अजूनही आठवतं जेव्हा आमचं लग्न झालं तेव्हा मला डान्स कसा करायचा हे माहीत नव्हतं. जेव्हा मी अर्पिताला पहिल्यांदा भेटलो, तेव्हा मी एक वाईट डान्सर होतो. आयुष शर्माच्या म्हणण्यानुसार, याच कारणामुळे अर्पिताने त्याला डान्स करुन स्वतःची खिल्ली न उडवण्याची ताकीद दिली होती.
स्टेजवर जाऊन तुमची खिल्ली उडवण्यापासून सावध राहा, अशी अर्पिताने आयुषला धमकी देऊन ठेवली होती. मात्र, त्याचबरोबर तिने असेही सांगितले आहे की, आज जेव्हा लोक आयुष शर्माच्या डान्सची स्तुती करतात तेव्हा तिला आश्चर्य वाटते. ती म्हणते, 'अरे देवा, स्टुडिओत तुम्ही किती तास डान्ससाठी घालवलेत ते त्यांना माहीत नाही'.
तसे, मनोरंजक गोष्ट म्हणजे आयुष शर्माला पहिल्याच चित्रपट 'लवयात्री'मध्ये डान्स परफॉर्मन्स देण्यासाठी खूप सराव करावा लागला होता.