मुंबई : बॉलिवूडचे स्टार किड्स देखील कायम या ना त्या कारणांनी चर्चेत असतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हल्ली सगळ्यात जास्त चर्चा होतेय ती, तैमूर अली खानची. ज्याचे फोटोज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसेच त्याचेच व्हिडिओ आवर्जून पाहिले जात आहेत. पण आता 
या पाठोपाठ आणखी एका स्टार किडचा फोटो फार चर्चेत आलाय. आणि तो म्हणजे 



सैफ अली खानची बहिण सोहा अली खानची मुलगी. सोहाने काहीच दिवसांपूर्वी एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. सोहा आणि कुणालने आपल्या मुलीचं नाव इनाया नौमी ठेवलं आहे. काहीच दिवसांपूर्वी कुणालने आपल्या मुलीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. 



त्यावेळी तिचा फक्त चेहरा दिसत होता. पण आता तिचे भरपूर फोटो सोशल मीडियावर शेअर झाले आहेत. आणि ती अगदी तैमूर सारखीच दिसत आहे. तैमूरच्या पहिल्या फोटोत तो देखील असाच दिसत होता. 



25 डिसेंबरला सोहा आणि कुणाल आपल्या मुलीसोबत दिसले. या वेळी सोहाने रेड कलरचा ड्रेस घातला होता तर इनाया रेड आणि व्हाइट रंगाच्या ड्रेसमध्ये दिसली. 



या फोटोत ती भरपूर क्यूट दिसत होती. पहिल्यांदाच हे तिघे एकत्र पाहायला मिळाले आहेत. 



एवढंच नाही तर इनायाला घेऊन जाताना कुणालने तिचा चेहरा देखील लपवला नाही. इनाया कॅमेरासमोर खूप शांत दिसली.