मुंबई : सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) आणि भारताचा सलामीवीर शुभमन गिल (Shubman Gill) हे दोघेही सोशल मीडियावर चर्चेचा विषय असतात. या दोघांच्या नात्याबद्दल अजून पर्यंत दोघांपैकी एकानेही काहीही स्पष्ट केलेले नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकताच पुण्यात विश्वचषक २०२३ चा भारत आणि बांगलादेश सामना पाहायला मिळाला. या सामन्यात भारताने विजय मिळवला. हा सामना पाहण्यासाठी सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरही स्टेडियममध्ये पोहोचली होती. जिथे तिने आपल्या केलेल्या एका कृतीतून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.


शुभमन गिलला चीअरअप करण्यासाठी पोहचली सारा तेंडुलकर!
खरंतर शुभमन गिलने या सामन्यात जबरदस्त कामगिरी केली. त्याने 57 धावा केल्यानंतर आपलं अर्धशतक पूर्ण केलं. गिलने असा षटकार मारला की, तिथे उपस्थित असलेल्या सगळ्यांनाच आनंद झाला.  मात्र सगळ्यात जास्त चर्चा साराच्या रिएक्शनची झाली. सारा तेंडुलकरच्या रिएक्शनमुळे सगळ्यांच्याचा नजरा तिच्यावर खिळल्या. सारा शुभमनच्या शानदार कामगिरीसाठी स्टेडियममध्ये  त्याला चीअर करताना दिसली. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये सारा आनंदाने टाळ्या वाजवताना दिसली.  हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सोशल मीडिया यूजर्सही खूप रंजक प्रतिक्रिया देत आहेत.


व्हिडिओ पाहिल्यानंतर यूजर्सनी मजेदार प्रतिक्रिया दिल्या
एका यूजरने कमेंट करत लिहीलं आहे की, "सचिन, तुमच्यासाईडन होकार आहे का?" तर आणखी एका यूजरने कमेंट करत लिहलीलं आहे की, "सारा वहिनी मैदानात आहे, आज आम्हाला 100 रन्स हवे शुभमन भाई." तर दुसर्‍या एका यूजरने लिहिलं की, "आम्ही खूप दिवसांपासून या क्षणाची वाट पाहत होतो." तर अजून एका युजरने कमेंट करून लिहिलं की, रिलेशनशिप कन्फर्म झालं आहे आणि  कंफ्यूजनही.



खरंच शुभमन-सारा एकमेकांना डेट करत आहेत का?
सारा तेंडुलकर आणि शुभमन गिल एकमेकांना डेट करत असल्याच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून येत आहेत. दोघंही अनेकदा एकत्र स्पॉटही झाले होते. त्याच वेळी, एकदा गिल देखील सारा अली खानसोबत दिसला होता, त्यानंतर चाहत्यांचा गोंधळ उडाला होता. शेवटी, शुभमन गिल कोणाला डेट करत आहे? पण या सामन्यात सारा तेंडुलकरने गिलला चिअरअप करताना पाहिल्यानंतर चाहत्यांचा संभ्रम दूर झाला आहे.