मुंबई : एमेजॉन प्राइमवर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'शेरनी' या चित्रपटातून पुन्हा एकदा लोकांची मनं जिंकणारी विद्या बालनचा एकॅडमी ऑफ मोशन पिक्चर्स अँड सायन्सेस या संस्थेने त्यांच्या संचालक मंडळामध्ये समावेश केला आहे. त्यांच्याव्यतिरिक्त निर्माती एकता कपूर आणि शोभा कपूर यांनाही ऑस्कर समितीत सहभागी होण्याचं निमंत्रण मिळालं आहे. यावर्षी जगभरातील एकॅडमीत एकूण 395 स्टार्स, निर्माते, दिग्दर्शक आणि चित्रपटांशी संबंधित विविध प्रकारचे तंत्रज्ञांचा समावेश आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावर्षी विद्या बालन ही भारतातील एकमेव कलाकार आहे जिला अकादमीने त्यांच्या प्रशासकीय मंडळाचं सदस्य होण्यासाठी आमंत्रित केलं आहे. अशा परिस्थितीत आता विद्या बालनला अ‍ॅकॅडमीसाठी निवडलेल्या चित्रपटांना मत देण्याचा अधिकार मिळाला आहे.


या अकादमीने यंदा विद्यान बालनला आपल्या प्रशासकीय मंडळाच्या यादीत समाविष्ट केलं आहे, तिच्या नावापुढे तिच्या 'कहानी' आणि 'तुम्हारी सुलू' या दोन बहुचर्चित चित्रपटांचा उल्लेख करण्यात आला आहे.



विद्या बालनच्या आधी दिवंगत वेशभूषा डिझाईनर भानु अथैया, निर्माता व अभिनेता आमिर खान, दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर, संगीतकार ए.के. आर. रहमान, साउंड डिझायनर रसूल पोकट्टी यांना एकॅडमीचे सदस्य म्हणून समाविष्ट केलं गेलं आहे.


विशेष म्हणजे 2016 मध्ये अकादमीने समितीमध्ये सामील होण्यासाठी जगभरातील 928 जणांना आमंत्रण पाठविलं होतं, ज्यात शाहरुख खान, दिवंगत सौमित्र चटर्जी, तब्बू, आदित्य चोप्रा नसीरुद्दीन शाह, डॉली अहलुवालिया, बल्लू सलूजा, अनिल मेहता, मेहदाबी यांचा समावेश होता. २०२० मध्येही अनेक भारतीय चित्रपट निर्माते व तंत्रज्ञांना ऑस्कर समितीकडून समितीत सामील होण्याचं निमंत्रण मिळालं होत.