भाईजानला मुंबईपेक्षा दुबई वाटते सुरक्षित, असं का म्हणाला Salman Khan?
Salman Khan News: सलमानला मुंबईपेक्षा दुबई जास्त सुरक्षित (Dubai Safe compare Mumbai) वाटू लागलीये. दुबई सुरक्षेच्या दृष्टीनं जास्त सेफ आहे. मुंबईमध्ये काहीही सुरक्षित नसल्याचं मत सलमानने नोंदवलं आहे. त्याच्या या वक्तव्यामुळे त्याने फॅन्स नाराज असल्याचं पहायला मिळतंय.
Salman Khan On Security: बॉलिवूडचा भाईजान अशी ओळख असलेल्या सलमान खानचा (Salman Khan) किसी का भाई किसी की जान नावाचा चित्रपट प्रदर्शित झालाय. त्यामुळे सध्या सलमानची चर्चा होताना दिसते. मात्र, चित्रपटानं चाहत्यांची निराशा केलीये. गेल्या काही दिवसांपासून जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. त्यानंतर मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) सलमानच्या सुरक्षेमध्ये वाढ केली होती. अशातच सलमान खान पुन्हा चर्चेत आलाय तो एका वक्तव्यामुळे.
सलमानला मुंबईपेक्षा दुबई जास्त सुरक्षित (Dubai Safe compare Mumbai) वाटू लागलीये. दुबई सुरक्षेच्या दृष्टीनं जास्त सेफ आहे. मुंबईमध्ये काहीही सुरक्षित नसल्याचं मत सलमानने नोंदवलं आहे. त्याच्या या वक्तव्यामुळे त्याने फॅन्स नाराज असल्याचं पहायला मिळतंय.
काय म्हणाला Salman Khan ?
इनसिक्योरिटी असण्यापेक्षा गरजेचं असतं सिक्युरीटी असणं. पण मला रस्त्यावर मोकळेपणाने सायकल चालवता येत नाही. मी एकटी कुठेही जाऊ शकत नाही आणि जेव्हा मी ट्रॅफिकमध्ये असतो तेव्हा मला भेडसावणारी सर्वात मोठी समस्या म्हणजे सिक्युरीटी, असं सलमान म्हणतो.
मी जिथं जातो, तिथं सिक्युरीटीसह जातो. मात्र, दुबईमध्ये या सर्व गोष्टींची गरज नाही. इथं टोटली सगळं सेफ आहे. मात्र, इंडियामध्ये किंचित प्रॉब्लेम आहे. मला माहितीये की जे होणार आहे, ते होणारच आहे, असं सलमान (Salman Khan On Security) म्हणताना दिसतोय.
आणखी वाचा - Anushka Sharma: लाडक्या बायकोच्या बर्थडेला विराटने शेअर केला 'तो' खास फोटो, म्हणाला...
मला धमकी मिळल्याने मला सिक्युरिटी देण्यात आली. मी त्या सर्व गोष्टी करतोय, ज्या मला सांगण्यात आल्या आहेत. लोक मला पाहून लकी असू शकतात. मात्र, मला सुरक्षेच्या दृष्टीने त्यांच्याहून 100 पटीने अधिक लकी असावं लागेल, असंही सलमान (Salman Khan) म्हणाला आहे.
दरम्यान, सलमान खान नेहमी लॉरेन्स बिश्नोईच्या गँगच्या निशाण्यावर होता. काही दिवसांपूर्वी जेलमधून दिलेल्या एका मुलाखतीमध्ये लॉरेन्स बिश्नोई याने सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर मुंबई पोलिसांनी सलमानला सेक्युरिटी दिली होती.