तमिळ व्यक्तीनं भारतावर शासन का करु नये? कमल हासन यांचं मोठं विधान
Kamal Haasan : कमल हासन यांनी नुकत्याच दिलेल्या एका कार्यक्रमात मोठं वक्तव्य केलं आहे.
Kamal Haasan : चेन्नईच्या नेहरू इनडोअर स्टेडियममध्ये 1996 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'इंडियन' या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाच्या म्युझिक लॉन्च कार्यक्रमात कमल हासन यांनी हजेरी लावली होती. त्या म्युजिक लॉन्च पेक्षा कोणत्या गोष्टीनं सगळ्यांचं लक्ष वेधलं असे तर ते अभिनेता कमल हासन यांच्या या कार्यक्रमातील भाषणानं. त्यांनी यावेळी आजच्या काळात भारतीय होण्याचा अर्थ काय आहे? यावेळी त्यांनी 'फूट डालो आणि राज करा' नीतिविषयी सांगत त्यांना प्रश्न उपस्थित केला की एका तमिळ व्यक्तीनं देशावर शासन का करायला नको.
'इंडियन 2'टीमचे आभार मानल्यानंतर कमल हासन म्हणाले की 'इंग्रजांकडून वापरण्यात आलेल्या फूट टाका आणि राज्य करा हे विचार आता काम करणार नाही. जेव्हा त्यांची रणनीति अपयशी ठरली तेव्हा इंग्रजांना परत जाण्यासाठी एक जागा होती. जर इथले को देखील असतं करतील तर त्यांना हे लक्षात ठेवावं लागेल की त्यांच्यासाठी परत जाण्यासाठी कोणतीही जागा नाही.'
पुढे ते म्हणाले की,'जर माझी ओळख काय असं म्हणायचं झालं तर आधी मी एक तमिळ आहे आणि मग एक भारतीय. ही तुमची सुद्धा ओळख आहे. तमिळ लोकांना कधी शांत राहायचे आणि कधी नाही हे चांगलं माहीत असतं. याआधी एकदा मी काहीतरी बोललो होतो आणि अडचणीत आलो. पण आता मला त्याची चिंता नाही. तो दिवस का येऊ नये जेव्हा एक तमिळ भारतावर राज्य करेल? जरा कल्पना करा, भारताची पहिली महिला पंतप्रधान आपण बनवू शकतो तर, आपण हे देखील घडवून आणू शकतो. '
1996 मध्ये सुपरहिट ठरलेल्या इंडियन या चित्रपटाचा सिक्वेल येणार आहे. तर त्याच्या या कार्यक्रमात शंकर, कमल हसन, अनिरुद्ध रविचंदर, रकुल प्रीत सिंग आणि काजल अग्रवाल यांच्यासह सिलांबरसन टीआर, लोकेश कनागराज, नेल्सन दिलीपकुमार, बॉबी सिम्हा आणि ब्रह्मानंदम यासारखे मोठमोठे कलाकार उपस्थित होते.
'इंडियन 2: झीरो टॉलरन्स' या चित्रपटावर 2019 पासून काम सुरु आहे. पण 2020 मध्ये सेटवर झालेल्या एका अपघातात क्रु जखमी झाल्यानं काम काही दिवस थांबवण्यात आलं होतं. त्यानंतर पुढे लागलेल्या कोविड-19 महामारीमुळे शूटिंगला पुन्हा एकदा विलंब झाला. त्यानंतर 2022 मध्ये या चित्रपटाच्या चित्रीकरणाला पुन्हा सुरूवात झाली. इंडियन २ या चित्रपटाविषयी बोलायचे झाले तर कमल हासन, काजल, सिद्धार्थ आणि रकुल हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार. 'इंडियन 2' 12 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे.