जयपूर : राजस्थानच्या २ भावांनी जगातील सुप्रसिद्ध शो अमेरिकाज गॉट टॅलेंटमध्ये आपल्या डान्सने जजेसला इंप्रेस केलं आहे. त्यांना डान्स पाहून जजेसने त्यांना स्टँडिंग ओवेशन देखील दिलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमेरिकाज गॉट टँलेंटच्या यूट्यूब चॅनेलवर हा व्हिडिओ रिलीज करण्यात आला आहे. ज्यामध्ये या भारतीय मुलांनी आपला परफॉरर्मेन्स सादर केला. रेहान और शकीर हे दोघे चुलत भाऊ आहेत. पण दोघांमध्ये चांगली बॉंडिंग आहे. 


रेहानला पाहून डान्स शिकण्याची शाकिरची इच्छा झाली. रेहानने शाकिरकडूनच डान्सची ट्रेनिंग घेतली. तो सध्या १० वर्षाचा आहे.



अमेरिकाज गॉट टॅलेंटमध्ये याआधी ही अनेक कलाकारांनी आपल्या परफॉरर्मेन्सने जजेसला इंम्प्रेस केलं आहे. 


याआधी भारताच्या V.Unbeatable ने अमेरिकाज गॉट टॅलेंट 2019 मध्ये आपल्या डान्सने मोठी प्रसिद्धी मिळवली होती.