मुंबई : आयपीएल २०१९ च्या यंदाच्या हंगामात सुरुवातीपासूनच क्रीडारसिकांची मनं जिंकणारा खेळाडू हार्दिक पांड्या याला पुन्हा एकदा नेटकऱ्यांनी निशाण्यावर घेतलं आहे. टेलिव्हिजन अभिनेत्रीने हार्दिकसोबतचा फोटो पोस्ट केल्यामुळे पुन्हा एकदा त्याला कॉफी विथ करण या कार्यक्रमातील त्याच्या वक्तव्याचीही आठवण करुन दिली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टेलिव्हिजन अभिनेत्री क्रिस्टल डिसूझा हिने इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हार्दिकसोबतचा फोटो पोस्ट करत 'मेरे भाई जैसा कोई हार्डीच नही है...', असं कॅप्शन लिहिलं. तिने या कॅप्शनमध्ये #brotherfromanothermother असा हॅशटॅगही जोडला. पण, हार्दिकला भाऊ म्हणणारी क्रिस्टल आणि तिची ही पोस्ट त्याला मात्र अडचणीत आणणारी ठरली. आज करके आया या त्याच्या वादग्रस्त विधानाचाच वारंवार वापर करत नेटकऱ्यांनी हार्दिकवर टीकेची झोड उठवली.







सोशल मीडियावर करण्यात आलेल्या या पोस्टमुळे फक्त हार्दिकच नव्हे, तर क्रिस्टचीही खिल्ली उडवण्यात आली. एका चुकीच्या वक्तव्यामुळे हार्दिकला पुन्हा एकदा अनेकांच्याच रोषाचा सामना करावा लागला. परिणामी क्रिस्टलच्या या पोस्टवर येणाऱ्या कमेंट पाहता अभिनेता अपारशक्ती खुराना यालाही या प्रकरणात उडी घ्यावी लागली. पण, नेटकऱ्यांची भूमिका आणि त्यांचा नाराजीचा सूर मात्र शेवटपर्यंत शमला नाही हे खरं.