मुंबई : World Cup 2019  क्रिकेट विश्वचषक सुरु असताना जवळपास पंधरा दिवसांनंतर क्रिकेटपटूंच्या पत्नी आणि कुटुंबातील मंडळींना खेळाडूंसोबत राहण्याची परनानगी देण्यात आली होती. याच आधारे अभिनेत्री अनुष्का शर्मा हिनेही परदेशाची वाट धरली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

क्रिकेट विश्वचषकादरम्यान, भारत विरुद्ध पाकिस्तानच्या सामन्यात अनुष्काची उपस्थिती असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. पण, त्या सामन्याच्या वेळी अनुष्का दिसली नाही. याविषयी क्रीडारसिक आणि चाहत्यांमध्ये चर्चा रंगण्यास सुरुवात होणार, तोच अनुष्का आणि विराटता एक फोटो प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ते लंडनमध्ये फिरताना दिसत आहेत. 


पाकिस्तानच्या संघाला नमवल्यानंतर भारतीय क्रिकेट संघात काहीसं निवांत वातावरण पाहायला मिळालं. ज्या निवांत वेळेचाच फायदा घेत विराटने हे क्षण त्याच्या पत्नीसोबत व्यतीत केले. यावेळी अनुष्का आणि विराटचा लूकही विशेष लक्षवेधी ठरला. विराट आणि अनुष्का म्हणजेच चाहत्यांची लाडची जोडी, 'विरुष्का' त्यांच्या नात्याच्या माध्यमातून नेहमीच #CouplwGoals देत असते. मग ती एखाद्या गोष्टीवर त्या दोघांची भूमिका असो, एकदुसऱ्याला प्रोत्साहन देणं असो किंवा निवांत वेळ व्यतीत करणं असो. 



दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआयकडून आखण्यात आलेल्या नियमावलीनुसार कोणत्याही क्रिकेटपटूची पत्नी या मालिकेदरम्यान त्याच्यासोबत फक्त पंधरा दिवसच राहू शकते. अनुष्का आणि विराटही या नियमांचं पालन करणार आहेत. किंबहुना अनुष्काने याच आधारे तिच्या वेळापत्रकाची आखणीही केली आहे.