India Idol 12 : आदित्य नारायणने पवनदीप-अरूणिताच्या प्रेमाबद्दल केला मोठा खुलासा
पवनदीपसाठी अरूणिता आणते खास सरप्राईज
मुंबई : इंडियन आयडल 12 मध्ये पवनदीप राजन आणि अरूणीता कांजिलाल यांची लव्हस्टोरी फुलताना दिसत आहे. दोघांची जोडी सगळ्यांना आवडत आहे. अनेकदा या जोडीबद्दल साऱ्या गोष्टी फेक असल्याचं प्रेक्षकांकडून म्हटलं जातं होतं. (Indian Idol 12 : Aditya Narayan open big Secret about Pawandeep and Arunita Love Story ) पण आता या कार्यक्रमातील सूत्रसंचालक आदित्य नारायणनेच याबाबत मोठा खुलासा केला आहे.
आदित्य नारायणने सांगितलं पवनदीप-अरूणितीच्या नात्यामागील गुपित
आदित्यने केलेल्या खुलासामध्ये या सगळ्या गोष्टी खोट्या आहेत. पवनदीप-अरूणिता हे फक्त मित्र आहेत. या दोघांमध्ये असंच काहीच सुरू नाही जे शोमध्ये दाखवलं जात आहे. या दोघांमधील प्रेम हे फक्त प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी आहे.
आदित्य पुढे सांगतो की, आम्ही मस्ती करत आहोत. लोक म्हणतात की,'आम्ही रिऍलिटी शो असल्यामुळे असे एँगल देतोय. ते खरंच आहे. हे सगळं खोटं आहे. पण प्रेक्षकांना हे आवडतं. त्यामुळे आम्हाला अंस करावं लागतं. ही एक स्ट्रॅटेजी आहे जी 90 मिनिटे प्रेक्षकांना बांधून ठेवते. फक्त प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी हे केलं जातं.'
कार्यक्रमात दाखवण्यात आलेल्या गोष्टींना गांभीर्याने घेऊ नका अशा गोष्टीमुळे प्रेक्षक कसे नाराज होतात? यावर आदित्य म्हणतो की,'हो, ही गोष्ट खरी आहे, पण प्रेक्षकांना याच गोष्टी आवडतात. देशात जी 136 करोड लोकसंख्या आहे त्यामध्ये प्रेम तर आहे. पवनदीप - अरूणती हे तरूण आहेत. त्यांच्या आयुष्याचे निर्णय ते स्वतः घेतील. आपण फक्त एन्जॉय करायला हवं. अशा गोष्टी गांभीर्याने घ्यायला नकोत. हे सगळ्यांना माहित आहे की, ही मस्करी आहे. कुणाचं नाव खराब करणे हा या कार्यक्रमाचा हेतू नाही. तर मनोरंजन करणे हा आहे. आम्ही प्रेक्षकांसाठी याला मजेशीर करतो.'