मुंबई : दमणमध्ये जवळपास 3 महिन्यांनंतर शूटिंग संपल्यावर रिअल्टी टीव्ही शो 'इंडियन आयडॉल'ची टीम मुंबईत परतली आहे. शोच्या निर्मात्यांनी या सीझनमधील स्पर्धकांना आणखी एक मोठं सरप्राईझ दिलं आहे. पवनदीप राजन, अरुणिता कांजिलाल, सन्मुखप्रिया, निहाल टॉरो, आशिष कुलकर्णी, मोहम्मद दानिश आणि सायली कांबळे या स्पर्धकांना मेकर्सने परत त्यांच्या घरी पाठवलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्पर्धकांना घरी का पाठवलं?
आपण जर आता विचार करत असाल की, निर्मात्यांनी एकत्रित बर्‍याच दिग्गज स्पर्धकांना बेदखल का केलं आहे, तर तसं नाही. खर तर, निर्मात्यांनी स्पर्धकांना घरी पाठवण्याची रणनीती बरीच मनोरंजक आहे. कारण हा कार्यक्रम आता फिनालेच्या दिशेने वाटचाल करीत आहे आणि इंडियन आयडल त्याच्या टीआरपीबाबत नेहमीच गंभीर असतं, म्हणून यावेळी निर्मात्यांनी मास्टर शॉट खेळला आहे.



वोटसाठी करणार अपील 
शोच्या सर्व दिग्गज स्पर्धकांना त्यांच्या घरी पाठविण्यामागची निर्मात्यांची रणनीती अशी आहे की, सगळे स्पर्धक घरी जाऊन आपल्या गावी राहणार्‍या लोकांचं मनोरंजन करतील. हे सगळे गायक आपापल्या जिल्ह्यात आणि राज्यात फिरून लोकांशी संपर्क साधतील आणि त्यांना वोट करण्याचं आवाहन करतील. अशाप्रकारे, अधिक मतं मिळविण्याची लढाई आता फक्त पडद्यावर अवलंबून नसणार आहे तर हे स्पर्धक गावोगावी-घरोघरी जाऊन प्रेक्षकांना मत देण्यासाठी आवाहन करतील.


सुरांसोबत मतांची जंग
मायदेशी परतल्यावर स्पर्धक पवनदीपने उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथसिंग रावत यांची भेट घेतली ज्यांचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केली जात आहेत. त्याचप्रमाणे अन्य स्पर्धकांनीही आपापल्या स्तरावर प्रयत्न तीव्र केले आहेत. आता हे पहावे लागेल की, सुरांसोबत ग्राउंड झिरोवर सुरू असलेल्या मतांच्या लढाईत कोणाला विजय मिळेल.