मुंबई : इंडियन आयडॉल 12 मधील सिंगिंग रिअॅलिटी शो ची सेकंड रनरअप सायली कांबळे हिची नुकतीच एंगेजमेंट झाली आहे. सायलीने तिचा बॉयफ्रेंड धवलसोबत साखरपुडा केला आहे. सायलीने तिच्या इंस्टग्रामवर या कार्यक्रमाचे फोटो शेअर केले आहेत.  या फोटोत धवलने सायली कांबळेच्या हाताला किस केल्याच दिसत आहे. एंगेजमेंटमध्ये धवलने ब्लू कलरचा ड्रेस परिधान केला होता. तर सायली कांबळेही बेबी पिंक ड्रेसमध्ये खूप सुंदर दिसत होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


सायली कांबळे आणि धवल लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. या वर्षी मार्च महिन्यात हे दोघं लग्न करणार असल्याच्या बातम्या समोर येत आहेत.यादरम्यान सायली कांबळेने तिची एंगेजमेंट रिंग फ्लॉंट केली. सायली कांबळेने तिच्या एंगेजमेंट इव्हेंटचा व्हिडिओही शेअर केला आहे.  जो खूप व्हायरल होत आहे. या गेटअपमध्ये सायली कांबळे एकदम मराठी मुलगी दिसत आहे. 



सायली कांबळेच्या एंगेजमेंटमध्ये इंडियन आयडॉलमधील तिचे मित्र- मैत्रिणी आले होते. यामध्ये नचिकेत लेले, निहाल तारो, अंजली गायकवाड आणि अनुष्का बॅनर्जी हे कटेस्टंट उपस्थित होते. निहाल तारो सायली कांबळेची बेस्ट फ्रेंड आहे.   इंडियन आयडॉलच्या हंगामात सायली आणि निहालच्या अफेअरची बातमी समोर आली होती.