मुंबई : 'इंडियन आयडॉल 12' (Indian Idol 12)  चा विजेता पवनदीप राजन (Pawandeep Rajan) हा नेहमीच चर्चेत असतो, मीडियापासून ते सोशल मीडियापर्यंत पवनदीप चर्चेचा विषय बनला आहे. त्यात जेव्हा पवनदीपचे नाव हे अरुणिता कांजीलालशी (Arunita Kanjilal) जोडले जाते, तेव्हा तर खात्रीने या दोघांच्या जोडी विषयी चर्चा होते. शोपासूनच या दोघांच्या जोडी विषयी बोलले जाते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अलीकडेच या दोघांचा शोमधील एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्यो दोघेही सिंगर रोमँटिक अंदाजात दिसत आहेत. पवनदीप राजन आणि अरुणिता कांजीलाल यांची जोडी सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. चाहत्यांना दोघांची जोडी पडद्यावर पाहायला आवडे हे दोघेही एकत्र खूप सुंदर दिसतात.


सध्या सोशल मीडियावर या जोडप्यांच्या डान्सचा व्हिडीओ. Indian Idol 12 नंतर दोघेही प्रचंड प्रकाशझोतात आले आहेत. त्याचबरोबर पवन सतत त्याचे नवीन डान्स आणि गाण्याचे व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असतोच. अशीच आणखी एक गोष्ट व्हायरल होत आहे, ज्यात पवन अरुणिताला प्रपोज करताना दिसत आहे.


रोमँटिक डान्स


व्हिडीओमध्ये पाहिले जाऊ शकते की, पवन आणि अरुणिता 'तेरा होना लगा हूं' या गाण्यावर रोमँटिक डान्स करताना दिसत आहेत. नंतर, पवन गुडघ्यावर खाली बसतो आणि अरुणिताला लाल गुलाबाचे फूल देऊन प्रपोज करतो. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. चाहत्यांना दोघांची ही स्टाईल खूप आवडत आहे. चाहतेही कमेंट करून त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.


त्याच्या एका चाहत्याने कमेंट करुन 'बेस्ट कपल' असे लिहिले आहे, तर दुसऱ्याने 'वाह: सो स्वीट टुगेदर बोथ देम' असे लिहिले आहे.



पवनदीप आणि अरुणिता यांचे सोशल मीडियावर वर्चस्व आहे


पवनदीप राजनने इंडियन आयडॉल 12 चे विजेतेपद पटकावले, तर अरुणिता कांजीलाल उपविजेती ठरली. शो दरम्यान, चाहत्यांनी दोघांवरही त्यांचे प्रेम दाखवले. शो आता संपला असेल, पण दोघांची लोकप्रियता मात्र वाढतच चालली आहे. शो दरम्यान, लोकांना या दोघांच्या गाण्याव्यतिरिक्त, रोमँटिक अँगल देखील दिसला. सध्या सोशल मीडियावर दोघांच्या स्टाईलचाच बोलबाला आहे.