मुंबई : रिअॅलिटी शो इंडियन आयडॉल (Indian Idol 12) च्या निमित्तानं काही चेहरे प्रसिद्धीझोतात आले. यापैकी सातत्यानं गाजणारी आणि प्रेक्षकांचं अमाप प्रेम मिळवणारी जोडी म्हणजे पवनदीप राजन आणि अरुणिता कांजीलाल यांची. (Pawandeep Rajan Arunita Kanjilal) ऑनस्क्रीन केमिस्ट्रीमुळं पवनदीप आणि अरुणिताला चांगलीच दाद मिळत गेली. आता तर, त्यांच्या नव्या गाण्यांची चाहत्यांना भुरळही पडू लागली आहे. पण, यातच असं काही झालंय की सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पवनदीप आणि अरुणितामध्ये त्यांचं नवं गाणं रिलीज होण्यापूर्वीच ते नेमकं व्हायरल कसं झालं हाच प्रश्न उपस्थित झाला आहे. पवनदीप आणि आशिष कुलकर्णी यांनी संगीतबद्ध केलेलं हे गाणं रिलीजच्या आधीच लीक झालं आहे. ज्यामुळं या जोडीसह त्यांची संपूर्ण टीमही हैराण आहे. 


हे गाणं एक रोमँटीक ड्युएट अर्थात युगूलगीत आहे. जे पवनदीप आणि आशिष कुलकर्णीनं 70 वादक, 10 तबला वादक, 15 ढोलक वादक यांच्या साथीनं लाईव्ह कंपोज केलं आहे. पण, गाण्याच्या ऑफिशिअर रिलीजपूर्वीच ते अशा पद्धतीनं समोर आल्यामुळं दिग्दर्शक आणि निर्मात्यांना धक्का बसला आहे. 


गाणं लीक कसं झालं याची काहीच कल्पना नाही, पण तरीही अगदी लहानसा भागच लीक झाल्यामुळं चिंता करण्याची फारशी काळजी नसल्याचं दिग्दर्शकांनी सांगितलं. हे गाणं पवनदीप आणि अरुणितावर चित्रीत करण्यात येणार आहे. ज्यासाठी हे दोघंही गेल्या काही काळापासून नृत्याचेही धडे गिरवत आहेत. 


रिअॅलिटी शोच्या निमित्तानं सर्वांसमोर आलेली ही जोडी आता अनेकांच्याच फेव्हरेट लिस्टमध्ये आली आहे. या दोघांनाही एकत्र पाहून चाहते त्यांना 'अरुदीप' म्हणून संबोधतात. यांच्या केमिस्ट्रीला आता पुढे नेमकं कोणतं वळण मिळतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.