या गुजराती वैज्ञानिकाला गरब्यात नो एन्ट्री
काय आहे यामागचं कारण?
मुंबई : नवरात्रीमध्ये गरब्याचं आयोजन अगदी देश - विदेशात केलं जातं आहे. अमेरिकेत देखील याचं आयोजन करण्यात येणार आहे. तेथील अटलांटा शहरात गरबा खेळायला गेलेल्या भारतीय असलेल्या वैज्ञानिक आणि त्याच्या मित्र परिवाराला गराब खेळण्यास मनाई करण्यात आली. या सगळ्यांना गरब्यातून बाहेर काढण्यात आलं. त्यांच असं म्हणणं आहे की, कारण त्यांच्या नावावरून आयोजकांना शंका निर्माण झाली की हे हिंदू आहेत की नाहीत. आयोजकांच असं म्हणण्यानुसार ते लोकं हिंदू नाहीत असा त्यांचा दावा आहे.
ही घटना गुजरातच्या वडोदरातील असलेल्या 29 वर्षांच्या करण जानीसोबत झाली आहे. अमेरिकेतील वैज्ञानिक गेल्या 12 वर्षांपासून अमेरिकेत राहत आहे. त्याने ट्विटरवर ट्वीट करताना शुक्रवारी सांगितलं की, तीन मीत्र अटलांटा येथील श्री शक्ती मंदिरसोबत आयोजित गरबा कार्यक्रम करण्यात आलं आहे. मात्र आयोजकांनी गरबा खेळण्यासाठी विरोध केला.
करना जानीने दिलेल्या माहितीनुसार गरबा आयोजकांनी त्यांना सांगितलं की, तुम्ही लोकं हिंदूप्रमाणे दिसत नाहीत. त्यामुळे तुम्हाला गरब्याला विरोध करण्यात आला आहे. तुम्ही हिंदू आहात हे कळत नाही.