...अन् या हिंदी गाण्यामुळे रॉ एजेंटचा वाचला जीव; सोनू निगमच्या वडिलांनी गायलं होतं `ते` गाणं
Raw Agent`s Life Got Saved By Lucky Bisht : सोनू निगमच्या वडिलांनी गायलेल्या `या` गाण्यामुळे वाचला भारतीय रॉ एजेंटचा जीव...
Raw Agent's Life Got Saved By Lucky Bisht : भारताच्या स्पेशल फोर्स आणि रॉ एजेंटवर अनेक चित्रपट आपण पाहिलेत. पण काही झालं तरी चित्रपट आणि खऱ्या फोर्ससमध्ये फरक हा असतो. दरम्यान, भारतातील एकमेव स्नायपर शूटर असलेल्या लक्ष्मण सिंह बिष्ट उर्फ लकी बिष्ट ज्याचं नाव जगातील सगळ्यात टॉपच्या 200 स्नायपर्समध्ये त्याचं नाव आहे. लकी बिष्टच्या आयुष्यावर लिहिलेल्या पुस्तकात अनेक सिक्रेट मिशन्सविषयी सांगितलं आहे. तर एका स्पेशल ऑपरेशन दरम्यान, कशा प्रकारे एका हिंद गाण्यानं त्याचा जीव वाचवला याविषयी एका पॉडकास्टमध्ये सांगितलं आहे.
लकी बिष्टनं सुशांत सिन्हाच्या पॉडकास्टमध्ये हा किस्सा सांगितला, जेव्हा तो स्पेशल ऑपरेशनसाठी दुसऱ्या देशात गेला होता. तो म्हणाला, आम्ही बुटं खरेदी करण्यासाठी बाहेर पडलो होतो. आम्हाला बुटांची ऑर्डर द्यायची होती कारण आमच्या मित्रांनी देखील बुटं मागवले होते. आम्ही ऑर्डर देत होतो तितक्यात आम्हाला कुठूनतरी हिंदी गाणं ऐकू आलं आणि ते देखील म्यानमार बॉर्डरवर. आम्हाला ते थोडं विचित्र वाटलं कारण खूप दिवसांनंतर आम्ही हिंदी गाणं ऐकलं होतं आणि जेव्हा ऐकलं ते सुद्धी म्यानमार बॉर्डरला. आम्ही लगेच विचारलं की इथे देखील हिंदी गाणी ऐकतात? त्यानं सांगितलं की हो हे हिंदी गाणचं आगे. आम्ही त्यांना विचारलं की कुठून आवाज येतोय? दुकानदारानं तिथून येतोय असं सांगितलं. त्यानंतर आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही बुटं पॅक करा.'
याविषयी सांगत लकी बिष्ट पुढे म्हणाला, आम्ही 20-25 बूटं घेऊन जाणार होतो, कारण कॅम्पमधून सगळ्यांना बाहेर पडण्याची परवानगी नव्हती. एक-दोन लोकांनाच फक्त आउट पास मिळतो, तेच सगळ्यांना लागणारा सामान घेऊन येतात. मी जसा त्या दुकानापर्यंत पोहोचलो आणि गाण ऐकतच होतो तितक्यात जमीन हादरी आणि एक धमाका झाला. खरंतर, जिथे आम्ही बुटं घेत होतो तिथपर्यंत कोणी आमचा पाठलाग केला होता. आमच्या विषयी कोणाला काही माहित मिळाली असेल. त्यानं इथे बॉम्ब प्लांट केला होता आणि अनेक दुकानं त्या ब्लास्टमध्ये उडाली. आम्हाला आधी कळलं नव्हतं की आमच्यासाठी इथे बॉम्ब प्लान्ट करण्यात आला होता. त्या गाण्यामुळे आम्ही वाचलो.
हेही वाचा : आवाजाला बेस मिळवण्यासाठी Bigg Boss काय खातात? सलमान खाननं प्रश्न विचारताच म्हणाले...
पुढे लकी बिष्टनं ते कोणतं गाणं होतं याचा खुलासा करत सांगितलं की ते गाणं ‘शुक्रिया शुक्रिया दर्द जो तूने दिया’ होतं. हे गाणं सोनू निगमचे वडील अगम कुमार निगम यांनी गायलं होतं. तर लकी बिष्ट ज्या बॉम्ब ब्लास्टविषयी बोलत होता तो 2004 मध्ये दीमापुर येथे झाला होता. त्या ब्लास्टमध्ये 30 लोकांचे निधन झाले होते तर 100 पेक्षा जास्त लोक घायाळ झाले होते. हा नागालॅन्डवर झालेला सगळ्यात मोठा आणि भयानक असा दहशतवादी हल्ला होता.