आवाजाला बेस मिळवण्यासाठी Bigg Boss काय खातात? सलमान खाननं प्रश्न विचारताच म्हणाले...

Salman Khan Bigg Boss : सलमान खानला जाणून घ्यायचंय बिग बॉसच्या आवाजाचं रहस्य... त्यासाठी काय खातात बिग बॉसला विचारताच दिलं असं उत्तर की तुम्हालाही होईल हसू अनावर

दिक्षा पाटील | Updated: Nov 23, 2024, 02:46 PM IST
आवाजाला बेस मिळवण्यासाठी Bigg Boss काय खातात? सलमान खाननं प्रश्न विचारताच म्हणाले... title=
(Photo Credit : Social Media)

Salman Khan Bigg Boss : बॉलिवूडचा भाईजान अभिनेता सलमान खान हा सध्या 'बिग बॉस'चं सुत्रसंचालन करत आहे. सगळ्यात आधी 2006 मध्ये या शोचा पहिला सीझन प्रदर्शित झाला होता. यावेळी या शोचं सुत्रसंचालन हे अरशद वारसीनं केलं होतं. सलमान खाननं या शोचं सुत्रसंचालन करण्याची सुरुवात ही 4 थ्या सीझनपासून झाली. 

सलमान खानचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ज्यात तो 'बिग बॉस' शी बोलताना दिसतोय. 'बिग बॉस' च्या चौथ्या सीझनपासून सलमान खान हा सतत या शोचं सुत्रसंचालन करत आला आहे. तर 'बिग बॉस' चा आवाज हा अतुल कपूर यांचा आहे. अतुल कपूर हे बिग बॉसची ओळख ठरले आहेत. अतुल हे एक व्हॉइस ओवर आर्टिस्ट आणि एक रेडियो जॉकी राहिले आहेत. तर सध्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये सलमान हा बिग बॉसला विचारतो. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

व्हिडीओच्या सुरुवातीला 'बिग बॉस' सलमान खानचं स्वागत करताना दिसत आहे. त्यानंतर सलमान म्हणतो की तुमचं खूप खूप धन्यवाद. बिग बॉस, बिग बॉस जी, बिग बॉस जी तुम्ही मला एक गोष्ट सांगात, तुमचा जो आवाज आहे, ज्याला बेस आहे. त्यासाठी तुम्ही काय खाता किंवा तुम्ही त्यासाठी कशी प्रॅक्टिस केली आहे.... नक्की काय केलं आहे? हा बेस आणण्यासाठी बिग बॉस नेमकं काय करतात. त्यावर उत्तर देत बिग बॉस म्हणतात, सलमान खान, आता तुम्ही जाऊ शकतात. हे ऐकून सलमान हसू लागतो आणि म्हणतो की बिग बॉस चिडले.' 

हेही वाचा : VIDEO : नयनतारा-विग्नेशनं दिल्लीच्या रेस्टॉरन्ट बाहेर जेवणासाठी लावली लाईन; तरी देखील...

हा व्हिडीओ पाहून लोक म्हणाले की आणि आम्ही बिग बॉस पाहणं सुरु केलं. दुसरा नेटकरी म्हणाला, आता हे स्वत: चं बिग बॉस आहेत. तिसरा नेटकरी म्हणाला, आता हा बिग बॉसचा बॉस आहे. या शोचे मधले काही सीझन संजय दत्त शिवाय फराह खाननं देखील सुत्रसंचालन केले होते. तर या शोच्या पहिल्या सीझनला अरशद वारसीनं होस्ट केलं. तर दुसरं सीझन शिल्पा शेट्टी आणि तिसऱ्या सीझनचं सुत्रसंचालन हे अमिताभ बच्चन यांनी केले.