मुंबई : 'ये जंग हैं इस जंग में कुछ भी हो चाहे मरेंगे या मारेंगे मिलेगी तो जन्नत ही...' आतंकवाद्यांच्या शोधात असलेल्या टोळीच्या प्रयत्नांभोवती चित्रपटाची कथा फिरताना दिसत आहे. चित्रपटात अभिनेता अर्जुन कपूर एक अव्हानात्मक भूमिका साकारताना दिसणार आहे. 'इंडियाज मोस्ट वॉन्टेड' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. आतंकवादी ओसामाला पकडण्यासाठी अर्जुन कपूर कशाप्रकारे रणनीती आखतो आणि त्याला या मिशनसाठी कोण-कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. याचे प्रकाशन चित्रपटात करण्यात आले आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फॉक्स स्टार स्टूडियोजच्या बॅनरखाली साकारण्यात आलेल्या चित्रपटाचे दिग्दर्शन राजकुमार गुप्ता यांनी केले आहे. अर्जुनने स्वत:च्या ट्विटर अकाउंटवरून चित्रपटाचे ट्रेलर प्रदर्शित केले आहे. 'इंडियाज मोस्ट वॉन्टेड' चित्रपटाची कथा सत्य कथेवर बेतलेली आहे. २४ मे रोजी 'इंडियाज मोस्ट वॉन्टेड' चित्रपटगृहात दाखल होणार आहे.   


चित्रपटात आतंकवाद्याला पकडण्यासाठी अर्जुन त्याच्या टीमसह नेपाळला जावून ओसामाला पकडण्याचा कट रचतो. त्याने २००७ पासून ते २०१३ पर्यंत ५२ हल्ले केले आहेत. त्यामध्ये एकूण ४३३ निष्पाप जीवांनी आपले प्राण गमावले. पण महत्वाचे म्हणजे चित्रपटात खलनायकाची भूमिका कोण साकारणार हे अद्याप समोर आलेले नाही.