`पंतप्रधान नरेंद्र मोदी` बायोपिकमध्ये `हा` अभिनेता साकारणार अमित शाह यांची भूमिका
पंतप्रधान मोदींची भूमिका अभिनेता विनेक ऑबेरॉय साकारणार हे सगळ्यांच ठाऊक होते पण भाजपा अध्यक्षांची भूमिका कोण साकारणार हे मात्र गुलदस्त्यात होते.
मुंबई : 2019 मध्ये कलाविश्वात थोर व्यक्तिंचे बायोपिक तयार करण्याचे सत्र सुरु आहे. बायोपिकच्या माध्यमातून थोर व्यक्तिंच्या यशोगाथेवर प्रकाश टाकण्यात येत आहे. 'पंतप्रधान नरेंद्र मोदी' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सिनेमात पंतप्रधान मोदींची भूमिका अभिनेता विनेक ऑबेरॉय साकारणार हे सगळ्यांच ठाऊक होते पण भाजपा अध्यक्षांची भूमिका कोण साकारणार हे मात्र गुलदस्त्यात होते. भाजपा अध्यक्ष अमित शाह यांच्या भूमिकेत अभिनेता मनोज जोशी दिसणार असल्याचे समोर येत आहे. सिनेमाची शूटिंग सध्या अहमदाबाद येथे सुरू अहे.
अभिनेता मनोज जोशी म्हणतात, 'मी खूप खुश आहे कारण पंतप्रधान मोदींच्या बायोपिकमध्ये मला अध्यक्ष अमित शाह यांची भूमिका साकारण्याची संधी मिळाली आहे. जेव्हा मला संदीप सिंग यांचा फोन आला तेव्हा मी थोडाही विलंब न करता भूमिकेसाठी होकार दिला.'
माझ्या मते सिनेमात भाजपा अध्यक्ष अमित शाह यांच्या भूमिकेला मनोज जोशीं योग्य न्याय देवू शकतात. असे कौतुकास्पद वक्तव्य निर्माते संदीप सिंग यांनी केले आहे. सिनेमात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नी जसोदाबेन यांची भूमिका अभिनेत्री बरखा बिष्टा साकारणार आहेत.
सिनेमा गुजरातच्या वेग-वेगळ्या भागांमध्ये चित्रीत करण्यात येणार आहे. सिनेमात दर्शन कुमार, बोमन ईरानी, जरीना वहाब, मनोज जोशी, प्रशांत नारायण, बरखा बिष्ट सेनगुप्ता, अक्षत आर सलूजा, अंजन श्रीवास्तव, राजेंद्र गुप्ता आणि यतिन कर्येकर यांसारखे दिग्गज कलाकार मोठ्या पद्यावर दिसणार आहेत. सिनेमा विवेक ऑबेरॉय आणि ओमंग कुमार यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होत आहे.