हैदराबाद: साऊथ सिने इंडस्ट्रीतील सुपरस्टार अल्लु अर्जुन याची अफाट लोकप्रियता आहे. त्याच्या सिनेमांना प्रेक्षक भरभरून प्रतिसाद देतात. त्यामुळेच अल्लु अर्जुनचे भाव चांगलेच वधारले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अल्लु अर्जुन आता एका सिनेमासाठी १३ ते १५ कोटी रूपये एका सिनेमासाठी घेतो. म्हणजेच बॉलिवूडच्या एखाद्या अभिनेत्या एवढेच पैसे तो घेतो. अल्लु हा त्याच्या शानदार लाईफस्टाईलसाठीही लोकप्रिय आहे. त्याच्या घराची चांगलीच चर्चा रंगलेली असते.मीडिया रिपोर्टनुसार, अल्लु एका सिनेमासाठी १३ ते १५ कोटी रूपये घेतो. फारच कमी लोकांना माहिती आहे की, अल्लु अर्जुन हा हैदराबाद येथील एका बंगल्यात राहतो आणि या बंगल्याची किंमत १०० कोटींपेक्षाही जास्त आहे. 



अल्लुचं हे घर इंटेरिअर डिझायनर आमिर आणि हमीदाने तयार केलं आहे. त्यांनी अल्लु आणि त्याच्या पत्नीच्या दोन ऑब्जेक्टीवला लक्षात ठेवून ते घर तयार केलं आहे. पहिलं म्हणजे घर बॉक्स शेपमध्ये असलं पाहिजे आणि दुसरं म्हणजे जास्त डिझाईन नसलं पाहिजे. बाहेरून हे घर बॉक्स सारखं दिसतं. पण या घराचं इंटेरिअल कमाल झालं आहे. घराच्या आत शानदार कॉरिडोर आहे, जे लिव्हिंग स्पेसकडे जातं. आत लिव्हिंग रूम, डायनिंग किचनपासून ते बार काऊंटरपर्यंत फॅसिलिटी देण्यात आल्या आहेत. 



फोर्ब्सच्या टॉप १०० सेलिब्रिटी लिस्टमध्ये मिळालं होतं स्थान:



अल्लुने फोर्ब्स इंडियाच्या टॉप १०० सेलिब्रिटीजमध्ये आपलं स्थान बनवलं होतं. तसेच तो २०१५ मध्ये टॉप ५० मध्येही होता.



फार कमी लोकांना माहिती आहे की, अल्लु अभिनेता चिरंजीवीचा नातेवाईक आहे. त्याचे वडील निर्माता अलु अरविंदसोबत चिरंजीवीची बहिण निर्मलाचं लग्न झालं आहे.



अल्लु आताच सिनेमात आला नसून त्याने याआधी बालकलाकार म्हणूनही केलं आहे. त्याने तो २ वर्षांचा असताना तेलुगु सिनेमा ‘विजेता’ मध्ये काम केलं होतं.



अल्लुने २०११ मध्ये स्नेहा रेड्डीसोबत हैदराबादमध्ये लग्न केलं. २०१४ मध्ये तो एका मुलाचा बाप झाला. २०१६ मध्ये अर्जुनने ८०० जुबली नावाने नाईट क्लब सुरू करून नव्या बिझनेससोबत जुळला.



२००३ मध्ये पहिल्यांदा अल्लु हा लीड रोलमध्ये तेलुगु सिनेमात ‘गंगोत्री’मध्ये दिसला होता. हा सिनेमा चांगलाच चालला आणि अल्लु स्टार झाला. आतापर्यंत त्याने १५ पेक्षा जास्त सिनेमात काम केलं आहे.





२००३ मध्ये पहिल्यांदा अल्लु हा लीड रोलमध्ये तेलुगु सिनेमात ‘गंगोत्री’मध्ये दिसला होता. हा सिनेमा चांगलाच चालला आणि अल्लु स्टार झाला. आतापर्यंत त्याने १५ पेक्षा जास्त सिनेमात काम केलं आहे.