मुंबई : कामाच्या व्यापातच व्यग्र असणाऱ्या अभिनेत्री कंगना रणौतने सध्या स्वत:साठी आणि कुटुंबीयांसाठी वेल काढल्यातं पाहायला मिळत आहे. चित्रीकरण, विविध कार्यक्रम आणि एकंदरच धकाधकीच्या आयुष्यातून उसंत मिळाल्यानंतर ती मुंबईपासून दूर गेली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या काही दिवसांपासून  बॉलिवूडची ही 'क्वीन' डोंगररांगांमध्ये वसलेल्या मनाली या तिच्या मुळ गावी पोहोचली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलेले आणि व्हायरल होणारे फोटो पाहता कंगना मनालीमध्ये चांगलीच रमली आहे असं म्हणायला हरकत नाही. 


निसर्गाच्या सानिध्ध्यात ती आपला भाऊ अक्षित रणौत आणि बहीण रंगोली चंदेल यांच्यासोबत पुन्हा एकदा बालपण अनुभवत असल्याचं पाहायला मिळत आहे. मुख्य म्हणजे कंगनाचा भाचा, चिमुरडा पृथ्वीसुद्धा त्यांच्या या धमाल- मस्तीचा आनंद घेत आहे. 


रंगोलीनेही तिच्या सोशल मीजिडिया अकाऊंटवरुन काही फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत क्वीन कंगना कशी हटके प्रकारे दिवाळी साजरी करत आहे, याची झलक सर्वांपर्यंत पोहोचवली आहे. 





पहाडी वातावरणातच मोठी झालेली कंगना जेव्हा जेव्हा आपल्या मुळ गावी जाते तेव्हा प्रत्येक वेळी तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्याजोगा असतो. यंदाही ऐन दिवाळीतच आणि थंडीच्याच दिवसांमध्ये तिला मनालीला जाण्याची संधी मिळाल्यामुळे  हा म्हणजे दुग्धशर्करा योगच आहे, असं म्हणणं वावगं ठरणार नाही.