मुंबई: फेसबुक, इंन्स्टाग्राम आणि ट्विटर सोशल मीडियाच्या माध्यमातून सामान्य माणसांची एक नवी ओळख बनत आहे आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या कलागुणांना चांगलीच वाव मिळत आहे. मागील वर्षी इंन्स्टाग्रामवर एका मुलीचे फोटो व्हायरल झाले होते. रोशनी कपूर असे नाव असणारी ही मुलगी एक फॅशन ब्लॉगर जी स्वत:च्या बळावर बॉलिवूडमध्ये ओळख बनवणयासाठी प्रयत्न करत आहे. इंन्स्टाग्रामवर तिचे 1 दशलक्ष चाहते आहेत. श्रीनगरमध्ये जन्मलेली रोशनी पंजाबच्या अमृतसर येथे शिकली आहे. रोशनी तिच्या फॅशन ब्लॉग आणि प्रवास लेखांबद्दल चर्चेत असते.
 
रोशनीने सांगितल्याप्रमाणे रोशनी लवकरच बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्याच्या तयारीत आहे. फॅशन व्यतिरिक्त रोशनी ट्रॅवल आणि फूड या विषयांवरही बॉग लिहीते. सध्या ती मालदीव येथे सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. तिचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.