वडिलांचं आलिशान घर सोडून नवरा नुपूरसोबत `या` घरात राहते आयरा खान
Aamir Khan`s Daughter Ira Khan : आमिर खानची लेक आयरा खान लग्नानंतर कुठे राहते माहितीये?
Aamir Khan's Daughter Ira Khan : बॉलिवूड अभिनेता आमिर खानची लाडकी लेक आयरा खान ही इतर कोणत्याही स्टारकिड्ससारखी लहाणाची मोठी झाली. परदेशात सतत प्रवास आणि आलिशान घर आणि त्यात कोणत्याही थिमवर आधारीत बेडरूम. पण आयराला हे सगळं आवडतं का... तर असं नाही आयराला एकदम सर्वसाधारण आयुष्य जगायला आवडतं. लग्नानंतर देखील ती साधारण जीवन जगत आहे आणि त्यात ती आनंदी आहे. आयारानं फिटनेस ट्रेनर नुपुर शिखरेशी वर्षाच्या सुरुवातीला लग्न केलं. मुंबई आणि राजस्थानमध्ये झालेल्या या ग्रॅंड वेडिंगची फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. लग्नानंतर आयरा कोणत्या घरात राहते हे तुम्हाला माहितीये का? नुपुरचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होतोय त्यात तिचं घर पाहायला मिळत आहे.
आमिर खानची लेक आयरानं कोणत्याही सेलिब्रिटीशी लग्न न करता फिटनेस ट्रेनर नुपुरशी लग्न केलं. त्याच्या घराचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. हा व्हिडीओ खरंतर खूप जुना आहे. या व्हिडीओत नुपुर आणि त्याची आई आहे. ते दोघं नेहमी सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ शेअर करत असतात. त्या व्हिडीओला पाहून एक कळतं की आयरानं तिच्या आणि नुपुरमध्ये असलेल्या चांगल्या बॉन्डमुळे किंवा त्यांचे विचार जुळतात आणि एकमेकांवर असलेल्या प्रेमामुळे लग्न केलं आहे.
त्याशिवाय नुपूरची आई प्रीतम यांनी एक किचनचा व्हिडीओ शेअर केला होता. तर प्रीतम या त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून त्यांचे डान्सचे अनेक व्हिडीओ शेअर करताना दिसतात. त्या स्वत: एक प्रोफेशन्ल डान्सर आहेत. तर त्यांनी अनेक अभिनेत्रींना देखील डान्स शिकवला आहे.
हेही वाचा : 'मध्यरात्री दिग्दर्शकानं हॉटेलमध्ये बोलावलं अन्...', उपासना ओरडत म्हणाली; 'माझ्या वडिलांच्या वयाच्या...'
दरम्यान, कोरोना काळात आयरानं नुपुरकडे फिटनेस क्लास जॉइन केला होता. त्याचवेळी त्या दोघांचं एकमेकांवर प्रेम झालं. त्यानंतर ते सोबतही राहत होते. आता त्या दोघांनी लग्न केलं असून ते आनंदी वैवाहिक आयुष्य जगत आहेत. ते दोघेही एकमेकांचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत त्यांचं एकमेकांवरचं प्रेम व्यक्त करताना दिसतात.