मुंबई : बॉलिवूड सुपरस्टार आमिर खानची मुलगी आयरा खान तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. आयरा खान गेल्या दोन वर्षांपासून बॉयफ्रेंड नुपूर शिखरेला डेट करत आहे. हे कपल अनेकदा सोशल मीडियावर एकमेकांचे व्हिडीओ आणि फोटो शेअर करत असतात. आता देखील आयरा आणि नुपूरचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. फोटोमध्ये आयरा आणि नुपूर एका रोमाँटिक अंदाजात दिसत आहेत. यावेळी जमलेल्या सर्वांची नजर फक्त आयरा आणि नुपूरवर आहे. सध्या सर्वत्र दोघांच्या नव्या फोटोची चर्चा रंगली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आरयाने फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये, 'Hey' असं लिहिलं आहे. आयरा आणि नुपूरचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. एवढंच नाही तर, त्यांच्या फोटोंवर अनेकांच्या लाईक्स कमेंट करत आहेत. अनेकांनी दोघांच्या फोटोवर 'हॉट' अशी कमेंट केली आहे. 



दरम्यान, आजराचा एका खास व्यक्तीसोबत फोटो व्हायरल झाला होता. या फोटोमध्ये आयरा तिची आजी झीनत हुसैनसोबत दिसत आहे. आमिरच्या मुलीने आजीला तिच्या प्रियकराची भेट घडवून आणली. ज्यानंतर लोकं विचारत आहेत की, दोघं लग्न करणार आहेत का? आता आयराने तिचा बॉयफ्रेंड नुपूरची आजी झीनत हुसैन यांच्याशी ओळख करून दिली आहे.


कोण आहे नुपूर शिखरे
नुपूर शिखर एक फिटनेस ट्रेनर आहे, तो आयरा खानला ट्रेनिंग देत आहे. नुपूर अभिनेता आमिर खानचाही फिटनेस ट्रेनर असल्याचं बोललं जात आहे. लॉकडाऊन दरम्यान आयरा आणि नुपूरने एकमेकांना डेटिंग करायला सुरूवात केली. आयरा आणि नुपूरचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात.