आयर्न मॅनचा २.१८ कोटींचा सूट चोरीला
सुपरहिरोच अडचणीत असेल तर ? कोण मदत करणार ? कोणीतरी सुपरहिरोचे कपडेच चोरलेयत.
नवी दिल्ली : सर्वसामान्य जेव्हा अडचणीत असतात तेव्हा त्यांना वाचविण्यासाठी सुपरहिरो येतात अस आपण सिनेमात पाहिल. पण सुपरहिरोच अडचणीत असेल तर ? कोण मदत करणार ? कोणीतरी सुपरहिरोचे कपडेच चोरलेयत. याची किंमत लाखात नाही तर चक्क २.१८ कोटी इतकी. हॉलीवुड सिनेमात आयर्नमॅनची भुमिका करणाऱ्या रॉबर्ट डाउनी ज्यूनियरचा 'ओरिजनल आयर्नमॅन'चा सूट चोरीला गेलाय. लॉस एंजिलिस पोलिसांनी या घटनेला पुष्टी जोडली आहे.
सूट चोरीला
रॉबर्ट डाऊनी ज्यूनियर याने २००८ साली आलेल्या 'ऑरिजनल सुपरहिरो' सिनेमात घातलेला गोल्ड अॅण्ड रेड सूट चोरी झालाय. या सूटला मंगळवारी स्टोरेज फॅसिलिटीतून चोरण्यात आला. पोलिसांनी हा सूट शोधण्यासाठी यंत्रणा सतर्क केली आहे. या चोराचा शोध लावण ही आमची प्राथमिकता आहे. याबद्दल अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
२.१८ कोटी सूटची किंमत
तुम्ही ऐकून हैराण व्हाल पण हे खर आहे. या सूटची किंमत ३,२५,००० डॉलर म्हणजेच २.१८ कोटी रुपये आहे. २००८ साली पहिल्यांदा आयर्न मॅनच्या रुपात रॉबर्ट डाऊनीने हा सूट घातला होता.