मुंबई : चित्रपट हा समाजाचा आरसा असतो पण प्रत्येक चित्रपटाला सेंसॉर बोर्डची मान्यता मिळणं तेवढचं महत्त्वाचं असतं. कोणत्या प्रकारचा चित्रपट प्रेक्षकांना पाहण्यासारखा आहे हे  सेंसॉर बोर्ड ठरवतं. प्रत्‍येक देशाचे स्‍वत:चे सेंसॉर बोर्ड असते जे चित्रपट प्रदर्शित होण्‍यापूर्वी पाहिल्‍यानंतर त्यांचे विश्‍लेषण करते. चित्रपटाची कथा फुलवण्यासाठी निर्माते आणी दिग्दर्शक प्रत्येक दृश्याला जिवंत करण्याचा प्रयत्न करतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या चित्रपटाने
 खून असो किंवा बलात्काराचा सीन असो, निर्माते ते सीन शक्य तितके वास्तविक दिसण्यासाठी प्रयत्न करतात. काहीवेळा अधिक कलात्मक बनण्याच्या प्रयत्नात, चित्रपट निर्माते सेन्सॉर बोर्डाने ठरवलेली सीमा ओलांडतात. जगातील सर्वात भयानक बलात्कार दृश्य असलेला चित्रपट तुम्हाला माहीत आहे का?  या चित्रपटामध्ये तब्बल 11 मिनिटांचा बलात्कार सीन दाखवण्यात आला. 



चित्रपटामध्ये तब्बल 11 मिनिटांचा बलात्कार सीन
चित्रपटाचं नाव आहे 'इर्रिवर्सेबल' (Irreversible).. या चित्रपटातील बलात्काराचे दृश्य इतक्या क्रूरतेने दाखवण्यात आले आहे की, सेन्सॉर बोर्डाला त्यावर बंदी घालावी लागली. या हॉलिवूड चित्रपटाबाबत फार कमी लोकांना माहिती आहे की, त्यात 11 मिनिटांचा बलात्काराचा सीन दाखवण्यात आला होता. 



चित्रपटातील बलात्काराचे दृश्य काय होते?
या चित्रपटात दाखवण्यात आले आहे की, एक मुलगी शहरातील एका निर्जन भुयारी मार्गातून जात असताना तिच्यासोबत ही भयानक घटना घडते. या चित्रपटात अभिनेत्री मोनिका बेलुचीने बलात्कार पीडितेची भूमिका साकारली होती. चित्रपटगृहांमध्ये या चित्रपटावर बंदी घालण्यात आली होती, त्यानंतर निर्मात्यांना या चित्रपटाचे सीन खूप कमी करावे लागले होते.