Irrfan Khan : बॉलिवूड दिवंगत अभिनेता इरफान खान आजही सगळ्यांच्या लक्षात आहे.  इरफान खाननं त्याच्या बॉलिवूड करिअरमध्ये अनेक चित्रपट केले. तर इरफाननं त्याच्या आयुष्याच्या करिअरमध्ये अनेक चित्रपट केले. त्यात फक्त बॉलिवूड चित्रपट नाही तर हॉलिवूड चित्रपट देखील आहेत. इरफान त्याच्या कामामुळे चर्चेत असला तरी त्याचं खासगी आयुष्य देखील तितकंच सुंदर होतं. इरफानला त्याचे वडील मुस्लिम असूनही ब्राह्मन असल्याचं का बोलायचे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इरफानचा जन्म हा जयपुरच्या मुस्लिम पठाण कुटुंबात झाला. इरफाननं कधीच मांसाहर केला नाही, तो फक्त शाकाहारी जेवण करायचा. त्यामुळे त्याला चिडवण्यासाठी त्याचे वडील त्याला म्हणायचे की पठाणच्या घरात ब्राह्मण जन्मला. इरफाननं मांसाहार करायला सुरुवात करावी यासाठी त्याच्या वडिलांनी अनेक प्रयत्न केले. इरफानला त्याच्या वडिलांनी अनेकदा शिकारीला घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. पण इरफानला ते आवडायचं नाही. त्याचं कारण त्याला प्राणी आवडायचे असं म्हटलं जातं. इरफाननं आयुष्यात कधीच नॉनव्हेज खाल्लं नाही. त्याचं म्हणणं असायचं की खाण्यासाठी खूप गोष्टी आहेत मग आपलं पोट भरण्यासाठी कोणत्याही जीव-जंतूचा जीव का घ्यायचा. 


इरफानला अभिनेका नाही तर क्रिकेटर व्हायचे होते. या गोष्टीचा खुलासा त्यानं स्वत: केला होता. त्यानं सांगितलं की "एकवेळ होती जेव्हा मी क्रिकेट खेळायचो. माझी निवड सीके नायडू टूर्नामेंटसाठी झाली होती. त्यात माझ्यासोबत 26 लोकांची निवड झाली होती. सगळ्यांनाच कॅम्पला घेऊन जाणार होते, पण मी जाऊ शकलो नाही कारण कॅम्पमध्ये जाण्यासाठी पैश्यांची व्यवस्था होऊ शकली नाही. मी तेव्हा ठरवलं की क्रिकेट सोडायला हवं, कारण त्यासाठी कोणाच्या ना कोणाच्या मदतीची गरज नक्कीत भासेल."


हेही वाचा : वडिलांचं आलिशान घर सोडून नवरा नुपूरसोबत 'या' घरात राहते आयरा खान


इरफानच्या कामाविषयी बोलायचं झालं तर त्यानं करिअरची सुरुवात ही दूरदर्शनच्या 'श्रीकांत' या मालिकेतून केली. ही मालिका 1985 मध्ये प्रदर्शित झाली होती. त्याशिवाय त्यानं ‘भारत एक खोज', 'चाणक्य', 'चंद्रकांता', 'सारा जहां हमारा', 'बनेगी अपनी बात' आणि संजय खान यांच्या ‘जय हनुमान’ मध्ये देखील काम केलं. इरफान खान सगळ्यात शेवटी अंग्रेजी मीडियम या चित्रपटात दिसला होता. 29 एप्रिल 2020 मध्ये इरफाननं अखेरचा श्वास घेतला.