मुंबई : इरफान खानच्या आगामी ‘ब्लॅकमेल’ या सिनेमाचा अफलातून आणि इंटरेस्टींग ट्रेलर रिलीज करण्यात आलाय. या सिनेमाचा ट्रेलर चांगलाच मजेदार असून यात इरफान खान, कृति कल्हारी, दिव्या दत्ता, अरूणोदय सिंह हे कलाकार दिसत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ट्रेलरवरून या सिनेमाची कथा चांगलीच इंटरेस्टींग आणि उत्सुकता वाढवणारी आहे. या वेगळ्या आणि बोल्ड विषयासाठी स्टारकास्टही दमदार निवडण्यात आली आहे. त्यामुळे हा सिनेमा बघण्यात चांगलीच मजा येईल असं चित्र आहे. 



गेल्या वर्षी ‘हिंदी मिडियम’ आणि ‘करीब करीब सिंगल’ सारख्या दर्जेदार सिनेमातून इरफानने धमाल उडवून दिली होती. आता ‘ब्लॅकमेल’मधून सस्पेंस आणि ट्विस्ट बघायला मिळणार आहे. या सिनेमाची निर्मिती टी-सीरीजने केली आहे. तर सिनेमाचं दिग्दर्शन ‘डेली-बेली’ फेम दिग्दर्शक अभिनय देव यांनी केलंय. हा सिनेमा ६ एप्रिलला रिलीज होणार आहे.