प्रसिद्ध अभिनेत्रीवर इंडस्ट्रीतून बहिष्कार; म्हणाली, हिंम्मत असेल तर...
नेहमीच ती कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.
मुंबई : भोजपुरी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री अक्षरा सिंह (Akshara Singh)च्या अभिनयाचे आणि सौदर्यांचे लाखो चाहते आहेत. नेहमीच ती कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. बुधवारी अभिनेत्री जौनपुर महोत्सवात पोहचली तिथे लोकांनी स्टेजवर दगडफेक केली. हा सगळा प्रकार पाहून तिचा राग अनावर झाला आणि ती त्या रागाच्या भरात तिथून निघून गेली. मात्र आता अभिनेत्रीने आपली बाजू आता सर्वांसमोर मांडली आहे.
नाराज झाली होती का अक्षरा?
दिलेल्या एका मुलाखतीत अक्षराने सांगितलं की, ''या शोमध्ये मोठ्या संख्येने लोकं पोहचली होते आणि आयोजकांनी सांगितलं की, या गर्दीला मॅनेज नाही करु शकत. त्यामुळे चेंगराचेंगरी होऊ नये म्हणून त्यांनी शो रद्द केला आणि सुरक्षेसाठी मला तिथून जाण्याचा सल्ला दिला.'' राग आल्यावर तिथून निघून गेल्यावर ती म्हणाली, दगडफेक असो किंवा काहीही असो, पण मला कधीच राग येत नाही. दगडफेकीच्या मुद्द्यावर ती म्हणाली की, दगड का फेकले हे माहित नाही, पण ते दगड तिच्यामुळे फेकले गेले नाहीत असं तिला वाटतं.
बायकॉटवर अक्षराचं मोठं वक्तव्य
या मुलाखतीत अक्षरा सिंहनेही बॉयकॉटच्या प्रश्नाला उत्तर दिलं. खरंतर काही काळापासून अशा अफवा उडत होत्या की, भोजपुरी इंडस्ट्रीतील कलाकार अक्षरासोबत काम करण्यास इच्छुक नाहीत. याविषयी बोलताना अक्षरा म्हणाली की, "असे प्रकार सुरू असतील तर त्या कलाकारांनी पुरुष म्हणून समोर यावं आणि त्यांना माझ्यासोबत काम करायचं नाही, असं म्हणावं. मात्र, ज्यांनी काम नाकारलं आणि माझ्याबद्दल नकारात्मक विचार केला त्यांच्याबद्दल मी काय बोलणार?"