Bhushan Kadu : 'हास्यजत्रे'तील अभिनेता भूषण कडू आपल्या सगळ्यांना आठवतोय... तुम्हाला आठवला ना तोच तो... मालिका आणि वेगवेगळ्या शोमधून आपल्याला हसवणारा भूषण अचानक शांत झाला. 2020-21 मध्ये जेव्हा कोरोनाचा काळ होता. त्याच काळात त्याच्या आयुष्यातील एक महत्त्वाची व्यक्ती गेली आणि ती म्हणजे त्याची जोडीदार त्याची पत्नी. पत्नीच्या निधनानंतर भूषण कडूला मोठा मानसिक धक्का बसला. ज्यानंतर तो कोणत्याही मालिका, चित्रपट किंवा कोणत्या कार्यक्रमात दिसला नाही. त्यानंतर त्याच्या चाहत्यांना एकच प्रश्न पडला आहे आणि तो म्हणजे भूषण कडू आता कुठे आहे आणि तो काय करतोय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2020-21 मध्ये आलेल्या कोरोना महामारीमध्ये अनेकांनी त्यांच्या जवळची माणसं गमावली. अनेकांची आयुष्य उद्धवस्त झाली. तर याच महामारीचा फटका हा अभिनेता भूषण कडूला देखील बसला. 29 मे 2021रोजी भूषणची पत्नी कादंबरी कडूचं कोरोनानं निधन झालं. मात्र, पत्नीच्या निधनानं भूषणला जबर मानसिक धक्का बसला. ज्यामुळे तो अभिनय क्षेत्रापासून दूर गेला. 
 
कादंबरी ही केवळ 39 वर्षांची होती. त्यांना एक मुलगा असून त्याचं नाव प्राकिर्थ आहे. पत्नीच्या निधनानंतर भूषणनं हाती असलेले सर्व प्रोजेक्ट सोडून तो अज्ञातवासात गेला. सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे त्याच्या काही वर्षांपूर्वी भूषणच्या पहिल्या पत्नीचे निधन झाले होते. यानंतर काही काळात त्याच्या दुसऱ्या पत्नीचंही निधन झाल्यानं तो नैराश्यात गेला. 


कादंबरीच्या निधनानंतर भूषण पहिल्यांदा दिसला तो 2022 मध्ये एका पार्टित. त्याचवर्षीच झी मराठीवरील हे तर काहीच नाही या कार्यक्रमात त्यांनं पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती. सध्या, भूषण अभिनय करताना दिसत नसला तरी तो लेखनाची धूरा सांभाळतोय. भूषण सध्या बालनाट्याचे लेखन करताना दिसतोय. त्याशिवाय तो अनेक अभिनय शिबीरांच्या माध्यमातून नवोदीत कलाकारांना मार्गदर्शन करण्याचे काम करतो. असे असले तरी भूषण पुन्हा एकदा मालिका चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांचा समोर यावं अशी इच्छा चाहते व्यक्त करताना दिसत आहेत. 


हेही वाचा : मार्च महिन्यात 'हे' 7 चित्रपट आणि सीरिज पाहू शकता ओटीटीवर


भूषण या आधी 'मराठी बिग बॉस सीझन 1' मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाला होता. याशिबवाय 'कॉमेडी एक्सप्रेस' आणि 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' यासारख्या शोमधून त्याला लोकप्रियता मिळाली होती.